एक्स्प्लोर

Maharashtra Congress : काँग्रेसमधील नेत्याचे पक्षश्रेष्ठींना भावनिक पत्र; वंचितला मविआमध्ये सामील करण्याबाबत पत्रातून केली विनंती

Maharashtra Congress : धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी वंचितला मविआमध्ये सामील करून घ्यावं, अशी विनंती खामगावचे माजी आमदार तथा काँग्रेस नेते दिलीप सानंदा यांनी केलीय.

Maharashtra Congress : राज्यात वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) मोठी ताकद असून वंचितचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) बोलावलेल्या प्रत्येक बैठकीत स्वतः हजर झालेले आहेत किंवा त्यांनी आपला प्रतिनिधी तरी पाठवलेला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची मनापासून इच्छा होती. मात्र काही कारणास्तव तसं होऊ शकलं नाही. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी वंचितला महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्यावं. 

तसेच, अकोला लोकसभा मतदारसंघात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी किंवा काँग्रेसकडून (Congress) कुठलाही उमेदवार देऊ नये, अशी विनंती खामगावचे माजी आमदार तथा काँग्रेस नेते दिलीप सानंदा (Dilip Sananda) यांनी केलीय. यासाठी सानंदा यांनी काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षातील उच्चपदस्थ पक्षश्रेष्ठींनी या आशयाचे भावनिक पत्र लिहले आहे. त्यामुळे आता काँग्रेस या पत्राची कशी दखल घेईल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वंचितला मविआमध्ये सामील करण्याबाबत पत्रातून केली विनंती

निवडणुकांच्या तारखा जश्या जश्या जवळ येत आहे, तसं तसं राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडीनां वेग येत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत महाविकास आघाडीची चर्चा फिस्कटल्या नंतर मविआसोबतच्या युतीची शक्यता जवळ जवळ मावळली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी इतर पर्यायांची चाचपनी सुरू केली असताना काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशातच खामगावचे माजी आमदार तथा काँग्रेस नेते दिलीप सानंदा यांनी भावनिक पत्र लुहून आपल्या भावना काँग्रेस पक्षातील पक्षश्रेष्ठींनी पत्राद्वारे कळवल्या आहेत. 

असा आहेत पत्राचा आशय 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार श्रध्देय बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु मा. श्री. ॲड. प्रकाशजी आंबेडकर हे लोकसभा निवडणुक 2024 मध्ये महाराष्ट्रातील अकोला लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीने बोलविलेल्या प्रत्येक बैठकीत ते आले किंवा त्यांचा प्रतिनिधी आले आहेत.  तसेच मुंबई येथील श्री शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये देखील त्या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केले होते. ॲड. प्रकाशजी आंबेडकर वंचित बहुजन आघाडीमधील सदस्यांची महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची मनापासून इच्छा होती. म्हणून त्यांनी स्पष्ट मनाने म्हटल होतं की, महाविकास आघाडीचे जे घटक आहेत त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मा. शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस, मा. उध्दवजी ठाकरे शिवसेना पक्ष यांनी पहिले त्यांच्या जागेचे वाटप करावे व त्यामधुन आपण किती जागा देवु शकतो अशी त्यांची मागणी होती.

त्यांनी म्हटलं होतं की, बुधवार दि. 27 मार्च 2024 पर्यंत तुम्ही मला सांगा नाही तर मी माझी भुमिका जाहिर करेल. त्यानुसार त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेवुन त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे पहिल्या टप्प्यामधील वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार जाहिर केले आहे. यामध्ये त्यांनी कोल्हापूर लोकसभा व नागपूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांनी जाहिर पाठींबा दिला आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. म्हणून अकोला लोकसभा मतदार संघामध्ये श्रध्देय प्रकाशजी आंबेडकर यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पाठींबा दिला पाहिजे, अशी सर्व काँग्रेस श्रेष्ठींना कळकळीची विनंती आहे. 

तसेच इतर टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीचे उमेदवार ठरविण्याकरीता श्रध्देय प्रकाशजी आंबेडकर यांच्याशी चर्चा करुन त्यांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हावे,  यासाठी विनंती करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार नाही. मा. श्री. प्रकाशजी आंबेडकर साहेबांची ताकद फार मोठी आहे. त्यांनी 20 जिल्ह्यांमध्ये मोठ-मोठ्या सभा घेवुन पंतप्रधान मोदी विरुध्द भाषण देवुन मतदार संघामध्ये जनजागृती केली आहे. त्यामुळे याबाबत विचार व्हावा. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget