बुलढाणा-चिखलीत दहीहंडी कार्यक्रमात जोरदार हाणामारी, दोन पथकांत दहीहंडी फोडण्यावरून वाद
Buldhana Dahi Handi News : चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले आणि भाजपा युवा मोर्चाने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात अक्षरशः अनेक गोविंदा जखमी झाले.
Buldhana Dahi Handi News : बुलढाण्यातील (Buldhana) चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात काल (शुक्रवारी) जोरदार हाणामारी झाली. दहीहंडीच्या कार्यक्रमात मध्यरात्रीपर्यंत धुमशान सुरु होतं. या हाणामारीत काही गोविंदाही जखमी झाले आहेत. दहीहंडी आधी कुणी फोडायची यावरून दोन मंडळांत वाद सुरु झाला आणि तो इतका विकोपाला गेला की, मध्यरात्रीपर्यंत हाणामारी झाली. पोलिसांचा बंदोबस्तही अपुरा पडला. अखेर दहीहंडी न फोडताच कार्यक्रम संपला.
काल (शुक्रवारी) चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले आणि भाजप युवा मोर्चानं आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात अक्षरशः अनेक गोविंदा जखमी झाले. दहीहंडी फोडण्यासाठी आपला नंबर आधी आहे, या कारणावरून अनेक दहीहंडी मंडळात सुरुवातीला वाद झाला. काही वेळात तो निवळला. पण नंतर पुन्हा दोन मंडळात वाद होऊन तो इतका विकोपाला गेला की, या ठिकाणी अक्षरशः गोविंदांमध्ये तुफान हाणामारी झाली. हाणामारीपुढे पोलीस बंदोबस्त तोकडा पडल्यानं ही हाणामारी अक्षरशः एक तास सुरू होती. यामुळे मात्र शेवटपर्यंत दहीहंडी न फुटता कार्यक्रम संपला.
बुलढाण्यातील आमदार श्वेता महाले यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात झालेल्या या हाणामारीत एक गोविंदा जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. दहीहंडी फोडण्यासाठी याठिकाणी अनेक गोविंदा जमले होते. यावेळी कोण सर्वात आधी हंडी फोडणार? या कारणावरुन दोन मंडळांमध्ये हाणामारी झाली. मध्यरात्रीपर्यंत दहीहंडी कार्यक्रमात अक्षरशः युद्धभूमी सदृश परिस्थिती होती.
दरम्यान, काल (शुक्रवारी) मुंबई (Mumbai),पुणे (Pune), नाशिक (Nashik), नागपूरसह (Nagpur) देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर अनेक ठिकाणी यंदा उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली. मुंबई, ठाण्यात अनेक ठिकाणी यंदा दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :