एक्स्प्लोर

Buldhana Bhendwal Ghatmandni : युद्ध होणार की नाही? साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या 'भेंडवळ' च्या भाकितांकडे साऱ्यांचे लक्ष; आज होणार मांडणी!

Buldhana Bhendwal Ghatmandni: पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावात 370 वर्षापासून प्राचीन अशी घटमांडणीची (Bhendwal Ghat Mandani) परंपरा जोपासली जाते.

Buldhana Bhendwal Ghatmandni बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या (Buldhana District) जळगाव जामोद तालुक्यातील (Jalgaon Jamod Taluka) पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावात 370 वर्षापासून प्राचीन अशी घटमांडणीची (Bhendwal Ghat Mandani) परंपरा जोपासली जाते. या ऐतिहासिक आणि मोठं संस्कृतिक महत्वअसलेल्या ही परंपरा शेतकऱ्यांसाठी बहु प्रतिक्षित पीक परिस्थिती, पाऊसपाणी त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी असून, संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.  " भेंडवळची घटमांडणी " दरम्यान, आज (30 एप्रिल) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे.

युद्ध होणार की नाही?'भेंडवळ'च्या भाकितांकडे साऱ्यांचे लक्ष

यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील..?  याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीतलावर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज घेणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे शेतकऱ्यांच , राजकीय नेत्यांच लक्ष लागलेल असतं. अशातच  नुकताच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) देशभरात संतापाची लाट पसरली आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत असताना कुठल्याही परिस्थिती मध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर भेंडवळच्या घट मांडणीच्या अंदाजाला ही  मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. युद्ध होणार की नाही? हे ही या भेंडवळच्या घट मांडणीत पुढे येण्याची शक्यता आहे.  दरम्यान, आज सायंकाळी 5.30  वाजता ही घट मांडणी होणार आहे व उद्या सकाळी सूर्योदयावेळी त्याचे अंदाज जाहीर करण्यात येणार आहेत.

घटमांडणीला शास्त्रीय आधार आहे का?

घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले, तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे. 

त्याच त्या गोष्टी वारंवार फिरवून सांगितल्या जातात- अंधश्रद्धा निर्मूलन समिती

दुसरीकडे, भेंडवळच्या घट मांडणीला अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने विरोध दर्शवला आहे. या अशा प्रकारच्या भाकिते व अंदाजानं कुठलाही शास्त्रीय आधार नसून गेल्या पाच वर्षात या अशा घटमांडणीचे कुठलेही अंदाज खरे ठरले नाहीत. त्याच त्या गोष्टी वारंवार फिरवून सांगितल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा घट मांडणीच्या अंदाजावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर यांनी केलेल आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget