एक्स्प्लोर
Shrimant Dagadusheth Ganpati : फळांचा राजा गणराया चरणी! अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य!
Shrimant Dagadusheth Ganpati : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आलाय.
Shrimant Dagadusheth Ganpati pune
1/6

Shrimant Dagadusheth Ganpati : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आलाय.
2/6

दरवर्षी प्रमाणे यंदा ही अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी गणरायाभोवती आकर्षक आणि मनमोहक आंब्यांची आरास करण्यात आली असून हे दृश्य सऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
3/6

तर दुसरीकडे मंदिरावर देखील फुलांनी आंब्यांच्या प्रतिकृती साकारली आहे. प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली आहे.
4/6

हि आंब्यांची आरास पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटे पासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
5/6

पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई आणि कुटूंबियांच्या वतीनं हा महानैवैद्य देण्यात आला.
6/6

तत्पूर्वी पहाटे तीन वाजता ब्रह्माणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला. त्यानंतर वेदश्री खाडिलकर ओक यांनी बाप्पाच्या चरणी आपली गायन सेवा सादर केली. सकाळी आठ ते बारा या वेळात गणेश याग हि आयोजित करण्यात आला.
Published at : 30 Apr 2025 09:20 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बीड
मुंबई
























