Manda Mhatre : दिसायला सोज्वळ पण व्हाईट कॉलर गुंड असलेल्यांना मोडून काढणार; निवडून येताच मंदा म्हात्रेंचा संदीप नाईकांवर हल्लाबोल
Manda Mhatre Warnimg To Sandeep Naik : संदीप नाईक यांनी बेलापूरमध्ये गुंड आणले, ते का आणि कशासाठी आणले होते असा सवाल आमदार मंदा म्हात्रे यांनी विचारला.
नवी मुंबई : संदीप नाईक हे दिसायला आणि बोलायला सोज्वळ आहेत, मात्र त्यांचं वागणं हे आतून अतिरेकी असल्याचा आरोप भाजपच्या बेलापूरच्या नवनियुक्त आमदार मंदा म्हात्रे यांनी केला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनेक गुंड आणले असं सांगत आता नवी मुंबईतील ही गुंडगिरी मोडीत काढणार असल्याचा इशाराही मंदा म्हात्रेंनी दिला.
बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईकांवर सडकून टीका करत गंभीर आरोप केलेत. इथे व्हाईट कॉलरचा गुंडा उभा राहिला जो दिसायला सोज्वळ, बोलायला सोज्वळ आहे. मात्र त्याचं वागणं आतून अतिरेकीपणाच होत. माझ्या मुलाला आणि मला प्रायव्हेट नंबरवरून फोन आले होते. निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी किती गुंड आणले, कुठून आणले आणि कशासाठी आणले? पण मी आणि पोलीस प्रशासन सतर्क होते म्हणूनच आम्ही बिंधास्त कामं करू शकलो.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संदीप नाईक यांचा केवळ 377 मतांनी पराभव केला होता. निवडून आल्यानंतर आता मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
संदीप नाईक यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी
बेलापूरमध्ये संदीप नाईक आणि भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली. विधानसभा निवडणुकीत केवळ 22 दिवस संदीप नाईक यांना मिळाले आणि या 22 दिवसांमध्ये मतरदारांपुढे पोहोचणारे संदीप नाईक यांना 91, 475 इतकी मते मिळाली . तर मंदा म्हात्रे यांना 91,852 मते पडली . त्यामुळेच मतदारांनी दिलेला कौल पाहता तांत्रिक विजय हा जरी भाजपच्या मंदा म्हात्रे यांचा झाला असला तरी संदीप नाईक हेच जनतेच्या मनातील खरे आमदार आहेत असे चित्र बेलापूर मतदारसंघात पहावयास मिळत आहे. संदीप नाईक यांच्या समर्थकांनी त्यांचा 'जनतेच्या मनातील आमदार' असा उल्लेख करत नवी मुंबईमध्ये बॅनरबाजी केली.
ही बातमी वाचा: