(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandara : विदर्भातील प्रसिद्ध अड्याळ घोडायात्रेला उत्साहात प्रारंभ, लाकडी रथ ओढण्याची 150 वर्षांची परंपरा आजही कायम
Bhandara : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील प्रसिद्ध घोडायात्रेला (Adyal Ghoda Yatra) उत्साहात सुरुवात झाली आहे.
Bhandara : विदर्भाची (Vidarbha) काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील प्रसिद्ध घोडायात्रेला (Adyal Ghoda Yatra) उत्साहात सुरुवात झाली आहे. जगन्नाथपुरीप्रमाणं याठिकाणीही हातानं लाकडी रथ ओढण्याची परंपरा आहे. ही परंपरा 150 वर्षांपासून सुरु आहे. मध्यरात्री पुजा झाल्यानंतर श्रीहरी बालाजी महाराजांची लाकडी मूर्तीची लाकडी घोड्याच्या रथावरुन भव्य मिरवणूक काढण्यात आली.
महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेश, छतीसगड राज्यातून भाविक दाखल
अड्याळमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहत घोडायात्रेला संपन्न होते. विशेष म्हणजे या ठिकाणी जगन्नाथपुरीप्रमाणे हातानं रथ ओढण्याची परंपरा आजही कायम आहे. या यात्रेसाठी विदर्भातूनचं नव्हे तर, अवघ्या महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेश, छतीसगड राज्यातून मोठ्या संख्येनं भाविक अड्याळमध्ये दाखल झाले आहेत. भोसले काळापासून ही रथ घोडायात्रा सुरु असून तब्बल 150 वर्षांचा कालावधी आता पूर्ण झाला आहे.
हनुमान मंदीरातून या घोडायात्रेला प्रारंभ
हनुमान मंदीरातून या घोडायात्रेला प्रारंभ होतो. ढोलताशा, डीजेच्या तालावर शेकडो तरुणाई भन्नाट डान्स करत श्रीहरी बालाजी महाराजांचा जयघोष करत घोडारथाची नगर भ्रमंती करत रथ बाजार ग्राऊंडवर थांबवतात. हनुमान जयंतीपर्यंत हा घोडारथ भाविकांच्या दर्शनासाठी बाजार ग्राऊंडवर ठेवण्यात येतो. मध्यरात्रीला नगर भ्रमणासाठी निघालेल्या या रथाला तरुणाई मोठ्या उत्साहात सहभागी होते. रथाची पहाटेपर्यंत मिरवणूक काढतात.
श्रीराम जन्मोत्सव ते हनुमान जयंतीपर्यंतो आठ दिवस चालणार यात्रा
दरम्यान, या प्रसिद्ध यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्रीराम जन्मोत्सव ते हनुमान जयंतीपर्यंत आठ दिवस ही यात्रा चालणार आहे. दरवर्षी या कार्यक्रमात हजारोच्या संख्येनं भाविक सहभागी होत असतात. यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. याठिकाणी पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.
यंत्रणा नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. प्रसिद्ध श्री बालाजी रथ यात्रेच्या (घोडायात्रा) निमित्तानं स्वयंभु हनुमंत देवस्थानात हजारो भाविक मोठ्या भक्तीभावानं येऊन दर्शन घेतात.
महत्त्वाच्या बातम्या: