Devendra Fadnavis: भूमिपूजन फलकावर फडणवीसांचे नाव नसणं ही प्रशासनाची चूक, महायुतीच्या आमदाराने दिली कबुली
देवेंद्र फडणवीस यांचं भूमिपूजन फलकावर नाव नसणं ही प्रशासनाची चूक असल्याचं आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले आहेत. भूमिपूजनाच्या फलकावर संबंधित विभागाचे मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव असणं अपेक्षित होतं, देवेंद्र फडणवीसांना मी स्वत: निमंत्रण दिलं होतं असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले आहेत.
![Devendra Fadnavis: भूमिपूजन फलकावर फडणवीसांचे नाव नसणं ही प्रशासनाची चूक, महायुतीच्या आमदाराने दिली कबुली Devendra Fadnavis name not on the Bhoomi Pujan board is the administration mistake Says Mahayuti MLA Devendra Fadnavis: भूमिपूजन फलकावर फडणवीसांचे नाव नसणं ही प्रशासनाची चूक, महायुतीच्या आमदाराने दिली कबुली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/00bba2bf0b665360fc5958542fa1f65e171923860418289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भंडारा : गोसीखुर्द प्रकल्पातून महत्त्वाकांशी जलपर्यटन प्रकल्पाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलं. मात्र या प्रकल्पावर लावण्यात आलेल्या फलकामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. या फलकावर जलसंपदा मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नावच नसल्यामळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. विशेष गोष्ट म्हणजे या फलकावर जलसंपदा सचिवांचं नाव आहे.. मात्र जलसंपदा मंत्री असलेल्या फडणवीसांचं नावच नसल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं भूमिपूजन फलकावर नाव नसणं ही प्रशासनाची चूक असल्याचं आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले आहेत. भूमिपूजनाच्या फलकावर संबंधित विभागाचे मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव असणं अपेक्षित होतं, देवेंद्र फडणवीसांना मी स्वत: निमंत्रण दिलं होतं असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले आहेत.
गोसीखुर्द प्रकल्पातून महत्त्वाकांशी जलपर्यटन प्रकल्पावर लावण्यात आलेल्या फलकावर जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव नाही, ही बातमी एबीपी माझाने दाखवताच प्रशासनाने त्या संदर्भात चूक केली आहे, संबंधित फलक लवकरात लवकर बदलावा, अशी सूचना स्थानिक आमदाराने केली आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर महायुतीचे आमदार नरेंद्र भोंडेकर खडबडून जागे झाले आहे भूमिपूजन संदर्भातला फलक आणि त्यावर कोणाचे नाव असणार याचा निर्णय सर्वस्वी प्रशासनानेच घेतला होता. मात्र त्या फलकावर जलसंपदा विभागाचे मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा नाव असायलाच हवं होतं. जलसंपदा विभागाचे मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा नाव त्या ठिकाणी नसणं ही प्रशासनाची चूक असल्याचे नरेंद्र भोंडेकर यांनी मान्य केले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर तो फलक बदलावा असे मत ही नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले आहे.
भूमिपूजनाच्या फलकावर नाव नसणे ही प्रशासनाची चूक : आमदार भोंडेकर
आजच्या कार्यक्रमासंदर्भात जलसंपदा विभागाचे मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मी स्वतः निमंत्रण दिले होते. मात्र ते उपस्थित राहू शकले नाही, तरीही भूमिपूजनाच्या फलकावर संबंधित विभागाचे मंत्री म्हणून त्यांचा नाव असणे अपेक्षित होते, त्यासंदर्भात प्रशासनाची चूक झाल्याचे भोंडेकर म्हणाले. फलकावर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे नाव खाली आणि जिल्हाधिकाऱ्यांचे नाव वर आहे. या संदर्भातही प्रशासनाने चूक केली आहे असे भोंडेकर यांनी मान्य केले आहे.
हे ही वाचा :
महायुती सरकारला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विसर? गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)