Bhandara News : धान कापणी करून घरी परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; वाहन उलटून 27 महिला मजूर जखमी
Bhandara Accident : धान कापणी केल्यानंतर गावाकडे परतणाऱ्या महिला मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह 27 महिला मजूर जखमी झाल्याची घटना पवनी तालुक्यातील सोनेगाव येथे घडलीय.
Bhandara News : धान कापणी केल्यानंतर एका वाहनांमध्ये बसून गावाकडे परतणाऱ्या महिला मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात चालकासह 27 महिला मजूर जखमी झाल्याची घटना भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील सोनेगाव येथे घडलीय. या सर्व जखमी महिला पवनी तालुक्यातील नेरला या गावातील रहिवासी आहेत. नेरला येथून त्या एका वाहनाने पवनी तालुक्यातील सोनेगाव इथं धान कापणीसाठी गेल्या होत्या. दुपारनंतर त्यांचं काम आटोपल्यामुळे त्या सर्व महिला चालकासह वाहनांमध्ये बसून गावाकडे परतत असताना चालकाच वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. अपघातानंतर सर्व जखमींना अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्व जखमी महिलांवर उपचार सुरू आहे.
वाहन उलटून 27 महिला मजूर जखमी
भंडार जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणीची लगबग सुरू आहे. विदर्भात अवकाळी पावसाचे सावट लक्षात घेता शेतकरी हार्वेस्टर आणि मजुरांच्या साहाय्याने धान कापणी उरकून घेत आहेत. त्यामुळे मजुरांची मोठ्या प्रमाणात मागणी असून धान कापणीला मजूरच मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, दूरवरून वाहनाने मजुर नेऊन शेतीची कामे उरकून घेतली जात आहेत. रविवार सकाळी सर्व मजूर हे अड्याळजवळील नेरला येथील गावातून सोनेगाव येथे धान कापणीला टाटाएस वाहनने (एमएच 36 एफ1060 ) नेहमीप्रमाणे जात होते.
त्यानंतर काम आटपून परत येत असतांना वाहनचालक महेंद्र मुरकुटे (रा. नेरला) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन शेतात उलटले. त्यानंतर या अपघातात 27 महिला मजूर जखमी झाल्याची माहिती पुढे आलीय. अपघाताची माहिती गावात मिळताच गावातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्व जखमी महिलांवर उपचार सुरू आहे.
तुमसर बाजार समितीत शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
बहुप्रतिक्षित तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित झाला. तब्बल अडीच वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Camp) संयुक्त बळीराजा जनहित पॅनलने निर्विवाद वर्चस्व स्थापन करताना त्यांचे एकूण 10 संचालक निवडून आणलेत. 18 संचालक पदासाठी झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे आणि भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला.
इतर महत्वाच्या बातम्या