एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजित पवारांचे भाषण सुरु असताना घोषणाबाजी, भंडाऱ्यातील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात गोंधळ

Bhandara News : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असल्याचं चित्र आहे. त्यातच भंडाऱ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भाषणावेळी गोंधळ झाला असल्याची माहिती समोर येतय.

भंडारा : भंडाऱ्यातील (Bhandara) शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा अशी घोषणा देत हातातले बॅनर फडकावले. दरम्यान या व्यक्तीला पोलिसांना तात्काळ ताब्यात घेऊन कार्यक्रम स्थळावरुन बाहेर नेले. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घमासान सुरु असल्याचं चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करत होते. त्याचवेळी हा गोंधळ झाला असल्याची माहिती समोर येत आहे. 

आरक्षण देताना ते सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे. इतर समाजालाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये, असे प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, काही लोक वेगळ्या पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप अजित पवारांनी त्यांच्या भाषणातून केला आहे. भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आजारपणातून बरे झाल्यानंतर अजित पवारांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमावेळी अजित पवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. 

'आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील' 

कुठल्याही घटकाला आरक्षण देत असताना दिलेला आरक्षण उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे आणि त्यामधून गरिबांना मदत झाली पाहिजे. आरक्षण मागणाऱ्यांना आरक्षणाची मदत झाली पाहिजे. मात्र असे आरक्षण देत असताना इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही,  याची खबरदारी ही घेणे आवश्यक असल्याचे अजित पवार म्हणाले. सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुढे आलाय. पण हे आरक्षण कायद्याच्या आणि संविधानाच्या निमयांच्या चौकटीत बसणं देखील आवश्यक असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. 

हे लोकाभिमुख सरकार - अजित पवार

शासन आपल्या दारी री कार्यक्रमातून सरकारकडून लोकांना अनेक लाभ दिले जात आहे. हे लोकाभिमुख सरकार आहे. लोकांना हे सरकार त्यांचं वाटलं पाहिजे. सव्वा  वर्षात अनेक चांगले निर्णय महायुती सरकराने घेतलेत.  एका रुपयात पीक विमा योजना त्याचंच एक उदाहरण.  याच योजनेत अग्रीम नुकसान भरपाई दिली जातेय. आता पर्यंत 47 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 964 कोटींची मदत दिली गेली. उर्वरित एक हजार कोटी लवकर दिले जाणार असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या कार्यक्रमातून दिली. 

हेही वाचा : 

Jalna : अंतरवली सराटीत लाठीचार्जचा आदेश कुणी दिला होता? देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठी बातमी समोर

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Bhandara Accident News: भाजप खासदाराच्या गाडीनं भंडाऱ्यात दोघांना चिरडलं; भंडाऱ्यातील तुमसर - रामटेक मार्गावरील घटना, गुन्हा दाखल करत अपघातग्रस्त वाहन जप्त
भाजप खासदाराच्या गाडीनं भंडाऱ्यात दोघांना चिरडलं; भंडाऱ्यातील तुमसर - रामटेक मार्गावरील घटना, गुन्हा दाखल करत अपघातग्रस्त वाहन जप्त
Bhandara News: सरकारकडून मंजुरी 100 कोटींची, पण 3 वर्षांत एक रुपयाचाही खर्च नाही; भंडाऱ्यातील बावनथडी पुलाच्या 'कासवगती' कारभारामुळं दोन राज्यांचा संपर्क धोक्यात
सरकारकडून मंजुरी 100 कोटींची, पण 3 वर्षांत एक रुपयाचाही खर्च नाही; भंडाऱ्यातील बावनथडी पुलाच्या 'कासवगती' कारभारामुळं दोन राज्यांचा संपर्क धोक्यात

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Embed widget