एक्स्प्लोर

Bhandara News : भंडाऱ्यात पुराचे थैमान; शहरासह जिल्हा रुग्णालयाचा पाणीपुरवठा बंद, फिल्टर प्लांटमध्ये पुराचे पाणी

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं चित्र सध्या आहे.

भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळं भंडारा (Bhandara) शहरातील पाणीपुरवठा (Water Supply) करणारा फिल्टर प्लांट पाण्याखाली आला आहे. त्यामुळे भंडारा शहराचा पाणीपुरवठा पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनानं सूचना दिली आहे.  तर, जिल्हा सामान्य रुग्णालयात होणारा पाण्याचा पुरवठाही बंद करण्यात आला आहे.शहरातील नागरीक आणि रुग्णालयातील रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांची पाण्यासाठी वणवण होऊ नये, म्हणून अग्निशमन विभागाच्यावतीने तात्पुराता पाण्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येईल. रविवार (17 सप्टेंबर) रोजी सकाळपासून शहरातील विविध प्रभागांमध्ये टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात येईल. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी फिल्टर प्लांटचा वीज पुरवठा बंद करण्यात आलाय. 

जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा वेढा

मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि गोंदियामधील धापेवाडा धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहू लागली. परिणामी गोसीखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तर वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून भंडारा - बालाघाट या आंतरराज्य मार्गासह  जिल्ह्यातील 20 पेक्षा अधिक मार्ग बंद करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या  बीटीपी भाजी मार्केट समोरून बॅक वॉटर प्रवाहित होतं असल्यानं या परिसरातील मार्ग बंद करण्यात आला. 

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

या पूरस्थितीचा फटका बसलेल्या  अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तर, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आलीये. जिल्हा प्रशासनाकडून देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि भंडारा शहरातील सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. गोसीखुर्द धरणाच्या 33 दरवाज्यांमधून जवळपास  5 लाख 77 हजार 759 क्युसेस प्रती सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला. 

संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट घोंघावत होतं. पण आता आलेल्या पुरामुळे देखील शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. तर शासनान तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी सध्या शेतकरी वर्गाकरुन करण्यात येत आहे. हवामान विभागाकडून राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे पूर्व विदर्भात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. 

हेही वाचा : 

Bhandara Rain: पूर्व विदर्भात जोरदार पाऊस, गोसीखुर्द धरणाचे सर्वच 33 गेट उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget