Bhandara News: भंडाऱ्यातील तरुणीच्या हत्येची चार वर्षानंतर उकल; दोन सख्ख्या भावांसह तिघांना अटक, चार दिवसांपासून तरुणीच्या मृतदेहाचा शोध सुरु
Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील कवलेवाडा या गावातील हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तब्बल चार वर्षांनी या गुन्ह्याची उकल झाली आहे.
भंडारा: दृश्यम चित्रपट सर्वांना आठवत असेलच त्यात गायब झालेल्या युवकाची पोलीस शोध मोहीम राबवते. अथक प्रयत्नानंतरही पोलिसांना शोध कार्यात यश येत नाही...काहीसा असाच प्रकार भंडाऱ्यातील (Bhandara News) गोबरवाही पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. तब्बल चार वर्षांनंतर तरुणीच्या खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन सख्ख्या भावांसह तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपींना खाकीचा हिसका दाखवताच तरुणीच्या मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानंतर भंडारा पोलीस चार दिवसांपासून तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप त्यांना मृतदेह शोधण्यात यश आलं नाही. पोलिसांच्या हाती अद्याप काहीही सापडलं नसल्याने पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलंय.
भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील कवलेवाडा या गावातील हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तब्बल चार वर्षांनी या गुन्ह्याची उकल झाली आहे. कवलेवाडा गावातील अल्पशिक्षित आदिवासी कुटुंबातील अर्चना ही 23 वर्षीय तरुणी गावातील गर्भश्रीमंत पाटलाच्या घरी काम करत होती. ती अचानक 20 एप्रिल 2019 ला गायब झाली. कुटुंबियांनी तिच्या बेपत्ता होण्याची पोलिसात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी काही दिवस शोध मोहीम राबविल्यानंतर प्रकरणाची फाईल बंद केली. मागील चार वर्षांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीच्या बाबत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही बंद झालेली फाईल पुन्हा उघडण्यात आली आहे.
तरुणीच्या मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावल्याची कबुली
गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावातील पाटील संजय बोरकर (47), राजकुमार बोरकर (50) या दोन सख्ख्या भावांसह त्यांचा चालक धरम सरयाम (42) या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्यांनी तरुणीच्या मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावल्याची कबुली दिली. यावरून आरोपींविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून असता आरोपींनी सांगितलेल्या जंगल परिसरात मृतदेहाची शोध मोहीम सुरू केली आहे.
अहोरात्र जंगल परिसरात खोदून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न
मागील चार दिवसांपासून पोलीस अहोरात्र जंगल परिसरात खोदून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत असला तरी, पोलिसांच्या हाती अद्याप काहीही सापडलेले नसल्याने पोलिसांसमोर एक मोठं आवाहन उभं ठाकलं आहे. मृतदेह शोधण्यात पोलीस प्रयत्नरत असेल तरी ज्यावेळी मृतदेह किंवा शरीराचे काही अवशेष सोडतील तेव्हा तपासाची दिशा बदलेल आणि आरोपींच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे ही वाचा :