वर्षभरात दिले 100 टक्क्यांनी रिटर्न्स, 'हा' शेअर बदलू शकतो तुमचं नशीब, लाँग टर्मसाठी गुंतवा अन् व्हा मालामाल!
सध्या शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळतोय. अशा स्थितीत कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी, हे शेअर बाजारातील तज्ज्ञांकडून समजून घेणे गरजेचे आहे.
मुंबई : शेअर बाजारात 13 सप्टेंबर रोजी अनेक चढउतार पाहायला मिळाले. या दिवशी अनेकांनी पैसे कमवले तर अनेकांनी गुंतवलेल्या पैशांचे मूल्यही कमी झाले. सध्याच्या व्होलाटाईल मार्केटच्या स्थितीत कोणत्या शेअरमध्ये (Share Market) गुंतवणूक करावी, हे जाणून घेणे गरजेचे आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञ संदीप जैन (Sandeep Jain) यांनी गुंतवणुकीसाठी एक जबरदस्त स्टॉक सूचवला आहे. या शेअरमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करून गुंतवणूक करण्याचा सल्ला संदीप जैन यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर हा शेअर खरेदी का करायला हवा? या शेअरची सध्याची स्थिती काय आहे? हे जाणून घेऊ या.
संदीप जैन यांनी गुंतवणुकीसाठी कोणता शेअर सूचवला
गुंतवणूक तज्ज्ञ संदीप जैन यानी Sandur Manganese हा शेअर गुंतवणूक करण्यासाठी सूचवला आहे. Sandur Manganese ही एक जुनी कंपनी आहे. विशेष म्हणजे या शेअरची स्थितीदेखील चांगली आहे. त्यामुळेच या शेअरला याआधीही अनेकांनी गुंतवणुकीसाठी निवडलं आहे.
Sandur Manganese - खरेदी करा
सध्या शेअरचे मूल्य - 499
टार्गेट - 625/650
कोणी किती गुंतवणूक केलेली आहे?
या कंपनीत प्रवर्तकांच्या गुंतवणुकीचे प्रमाण 74.22 टक्के आहे. ही एक चांगली बाब म्हणावी लागेल. 23.56 टक्के सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीत गुंतवणूक केलेली आहे.
सध्या या कंपनीची स्थिती काय आहे? (Sandur Manganese Fundamentals)
तज्ज्ञांच्या मतानुसार या कंपनीची आर्थिक स्थिती चांगली आहे. नफ्याच्या वाढीबाबत बोलायचे झाल्यास सध्या नफ्याचे प्रमाण 15 टक्के आहे. तर विक्रीचा CAGR 16 टक्के आहे. या कंपनीचा तिमाही निकालही चांगला आहे. या कंपनीने दरम्यानच्या काळात आपले कर्ज कमी केलेले आहे. या कंपनीत देशांतर्गत तसेच परदेशी गुंतवणूकदारांनीही गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळेच या कंपनीला तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
5 रेकॉर्डतोड आयपीओ! गुंतवणूकदारांचे पैसे थेट दुप्पट केले; तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?
'या' पाच पेनी स्टॉक्सची हवा! अनेकांना दिले दमदार रिटर्न्स, तुम्हीही होणार का मालामाल?
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा स्कॅम, डिस्काउंट शेअरच्या नावाखाली लोकांची लाखोची फसवणूक