5 रेकॉर्डतोड आयपीओ! गुंतवणूकदारांचे पैसे थेट दुप्पट केले; तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?
सध्या अनेक कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. आतापर्यंत अशा 50 कंपन्या आहेत, ज्या शेअर बाजारावर सूचिबद्ध झाल्या आहेत. यातील साधारण 40 कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दमदार सिटर्न्स दिलेले आहेत.
नई दिल्ली: आर्थिक वर्ष 2024 मध्ये साधारण 50 कंपन्यांनी आपले आयपीओ आणले आहेत. या कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून साधारण 53,500 कोटी रुपये जमवले आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच दमदार रिटर्न्स दिलेले आहेत. यातील साधारण 40 कंपन्यांनी आपल्या इश्यू प्राईजच्या तुनलेत साधारण 10 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत. यातही अशा काही कंपन्या आहेत, ज्यांच्या आयपीओंच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना थेट 100 टक्क्यांपेक्षाही अधिक रिटर्न्स मिळवले आहेत. अशाच पाच आयपीओंची माहिती जाणून घेऊ या..
ज्योती सीएनसी ऑटोमेशन
Jyoti CNC Automation ही कंपनी 16 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली होती. शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच या शेअरचे मूल्य आपल्या 331 या इश्यू प्राईसपेक्षा साधारण 242 टक्क्यांनी वाढले होते. शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच हा शेअर 1,133 रुपयांपर्यंत वाढला होता.
एक्झिकॉम टेली सिस्टम्स
Exicom Tele-Systems शेअर बाजावर 5 मार्च 2024 रोजी लिस्ट झाला होता. या कंपनीचा आयपीओ आला होता तेव्हा या कंपनीच्या शेअरची इश्यू प्राईज 142 रुपये होती. हेच मुल्य नंतर 147 टक्क्यांनी वाढून थेट 351 रुपयांवर पोहोचले होते.
प्रीमियर एनर्जी
Premier Energies ही कंपनी 3 सप्टेंबर 2024 रोजी शेअर मार्केटवर लिस्ट झाली होती. शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच या कंपनीच्या इश्यू प्राईजचे मूल्य 450 रुपयांवरून थेट 1,097 रुपयांपर्यंत वाढले होते. म्हणजेच शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच या कंपनीच्या इश्यू प्राईजमध्ये 144 टक्क्यांची वाढ झाली होती.
प्लॅटिनम इंडस्ट्रीज
Platinum Industries ही कंपनी 5 मार्च 2024 रोजी शेअर बाजारावर लिस्ट झाली होती. या कंपनीचा आयपीओ आला तेव्हा या शेअरची इश्यू प्राईज 171 रुपये होती. हीच इश्यू प्राईज नंतर 129 टक्क्यांनी वाढून शेअरचे मूल्य थेट 392 टक्के झाले होते.
भारती हेक्साकॉम
Bharti Hexacom हा आयपीओ 12 एप्रिल 2024 रोजी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला होता. या कंपनीचा आयपीओ आला तेव्हा या कंपनीच्या शेअरची इश्यू प्राईज 570 रुपये होती. हा शेअर स्टॉक मार्केटवर सूचिबद्ध झाला तेव्हा त्याच्या इश्यू प्राईजचे मूल्य 117 टक्क्यांनी वाढून थेट 1,236 रुपयांपर्यंत वाढले होते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
प्रत्येक 10 वर्षांनी आधार कार्ड अपडेट का करावे? वाचा फायदा काय?
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा स्कॅम, डिस्काउंट शेअरच्या नावाखाली लोकांची लाखोची फसवणूक
Gautam Adani : संपत्तीत 16500 कोटींची वाढ, तरीही गौतम अदानींना झटका, नेमकं काय घडलं?