'या' पाच पेनी स्टॉक्सची हवा! अनेकांना दिले दमदार रिटर्न्स, तुम्हीही होणार का मालामाल?
सध्या शेअर बापाजारात तेजी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीर बम्पर रिटर्न्स देणाऱ्या पाच पेनी स्टॉक्सवर नजर टाकुया. हे शेअर भविष्यात चागंले रिटर्न्स देऊ शकतात.
मुंबई : गुरुवारी शेअर बाजारात अभूतपूर्व तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी पहिल्यांचाद निफ्टीने 25400 अंकांपर्यंत मजल मारली. तर मुबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ऑल टाईम हाय नोदंवद 83000 अंकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दुपारनंतर शेअर बाजारात ही घडामोडी दिसून आली. दरम्यान, आज शुक्रवारी मात्र आतापर्यंत तरी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झालेली दिसत नाही. उलट या दोन्ही निर्देशांकात किरकोळ पडझड झाली आहे. दरम्यान, आज शुक्रवारी शेअर बाजारावर दमदार रिटर्न्स देण्याची ताकद असलेल्या पाच पेनी स्टॉक्सबद्दल जाऊन घेऊ.
गुरुवारी काही पेनी स्टॉक्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले. काही पेनी स्टॉक्सना तर 20 टक्क्यांपर्यंत अपर सर्किट लागलं. या पेनी स्टॉक्सचे मूल्य हे 13 रुपयांपासून ते 21 रुपयांपर्यंत आहे. याच शेअर्समध्ये शुक्रवारीही मोठे चढउतार पाहायला मिळू शकतात. हे पाच पेनी स्टॉक्स खालीलप्रमाणे आहेत.
Decorous Investment & Trading
डेकोरस इंन्वेस्टमेंट अँड ट्रेडिंग या स्टॉकमध्ये गुरुवारी 20 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. त्यामुळेच हा शेअर गुरुवारी 12.90 रुपयांवर बंद झाला होता. गुरुवारी या शेअरमध्ये अनेकांनी गुंतवणूक केली. शुक्रवारीदेखील या शेअरचे मूल्य वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सध्या हा शेअर 13 रुपयांवर आहे.
Gilada Fin. & Inv.
गिलाडा फायनॅन्स अँड इन्वेस्टमेंट हा शेअर गुरुवारी 20 टक्क्यांनी वाढला. गुरुवारी हा शेअर 13.22 रुपयांपर्यंत पोहोचला होता. शुक्रवारीही या शेअरमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. सध्या हा शेअर 14.64 रुपयांवर आहे. त्यामुळे सध्या गुंतवणूकदार या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात.
Indian Acrylics
इंडियन अॅक्रॅलिक्स हा शेअर गुरुवारी 17.80 टक्के वाढीसह 15.12 रुपयांवर स्थिरावला होता. शुक्रवारीदेखील या शेअरचे मूल्य वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण सध्या हा शेअर 1.98 टक्क्यांच्या घसरणीसह 14.82 टक्क्यांवर आहे. दिवसाअखेर पुन्हा या शेअरचे मूल्य वाढणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
RTCL Lt
आरटीसीएल लिमिटेड या कंपनीच्या शेअरमध्ये गुरुवारी 14.60 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. हा शेअर गुरुवारी 20.84 रुपयांपर्यंत वाढला होता. आजदेखील हा शेअर तेजीत असून 4.61 टक्क्यांच्या वाढीसह 21.80 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.
Pil Italica Lifestyle
पीआई इटालिका लाइफस्टाइल हा शेअर गुरुवारी 15 टक्के वाढीसह 15.10 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवारी या शेअरमध्ये वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र सध्यातीर हा शेअर 1.32 टक्क्यांच्या घसरणीसह 14.90 रुपयांवर घसरला आहे. आज दिवसाअखेर हा शेअर पुन्हा एकदा वाढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
5 रेकॉर्डतोड आयपीओ! गुंतवणूकदारांचे पैसे थेट दुप्पट केले; तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा स्कॅम, डिस्काउंट शेअरच्या नावाखाली लोकांची लाखोची फसवणूक