Walmik Karad Wife : मोठी बातमी : वाल्मिक कराड फरार, सीआयडीकडून त्यांच्या पत्नीची चौकशी
Walmik Karad Wife Manjili Karad, Beed : खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार झाले होते. आज त्यांच्या पत्नी मंजिली कराड यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आलीये.
Walmik Karad Wife Manjili Karad, Beed : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. देशमुख यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून सीआयडीने अनेकांची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, या प्रकरणात गंभीर आरोप होत असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) फरार आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याही प्रकरणात ते अद्याप फरार असल्याने त्यांच्या शोध घेण्यासाठी सीआयडीने वाल्मिक कराड (Manjili Karad) यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
खंडणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार असल्याने पत्नीची सीआयकडून चौकशी
अधिकची माहिती अशी की, वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. खंडणीच्या गुन्हा प्रकरणात सध्या वाल्मिक कराड फरार आहेत. दरम्यान, सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये जिथे सीआयडीचं पथक सकाळपासून काम करत आहे. त्यांनी दोन ते अडीच तास मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलंय. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होते, त्यानंतर त्यासंदर्भातील चौकशीचा भाग असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही सीआयडीकडून चौकशी
दरम्यान, सीआयडीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, चौकशी झाल्यानंतर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि या दरम्यान धनंजय मुंडे यांच्या पीआरचं काम वाल्मीक कराड हे बघायचे. माझा त्यांचा संपर्क सुद्धा होत होता. मी त्यांना ओळखतो का हे विचारण्यासाठी मला आज पोलिसांनी बोलून घेतले होते, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्डhttps://t.co/j0YB6Llrw3#maharashtra #police #bangladeshiyouths #solapur #mohol
— ABP माझा (@abpmajhatv) December 27, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या