Job Majha :जॉब माझा : बॉम्बै मर्कटाइल को-आपरेटीव्ह बॅकमध्ये नोकरीची संधी : ABP Majha
Job Majha :जॉब माझा : बॉम्बै मर्कटाइल को-आपरेटीव्ह बॅकमध्ये नोकरीची संधी : ABP Majha
सरकारी नोकरीसाठी बारावी पास आणि पदवीधर विद्यार्थ्यांकडून जोमाने प्रयत्न सुरू असतात. सरकारी नोकरीसाठी जाहिरात कधी निघते आणि आपण कधी अर्ज भरतो, असेच त्यांचं नियोजन असते. त्यानुसार, लेखी परीक्षांची तयारी देखील त्यांच्याकडून केली जाते. बँकींग परीक्षा, पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षांच्या तयारीत ते स्वत:ला झोकून देऊन प्रयत्न करतात. या सर्व उमेदवारांना आता बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) लिपिक पदाच्या 50 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. त्यामुळे, इच्छुक व शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी (JOB) अर्ज करता येईल.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक पदासाठी आरक्षण निहाय जागांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. एकूण 50 जागांसाठी ही भरती निघाली असून मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेल्या उमेदवाराला या नोकरीसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी, वयोमर्यादा किमान 20 आणि कमाल 28 ठेवण्यात आली आहे. 1 एप्रिल 2024 रोजीच्या तारखेला अनुसरुन उमेदवाराचे वय ग्राह्य धरले जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 24 हजार ते 65 हजार रुपयांपर्यंतच वेतन मिळणार आहे. यासाठी अर्ज करण्यास आजपासून सुरुवात झाली असून शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 ही आहे.