Santosh Deshmukh Murder Case : मोठी बातमी : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात, 20 दिवस उजाडले तरी ठोस कारवाई नाहीच
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलीये.
Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील (Beed Crime) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) यांनी निर्घुण हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. बीड जिल्ह्यात शनिवारी (दि.28) सर्व पक्षीय नेत्यांकडून आणि राज्यभरातील नागरिकांकडून मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर निषेध सभेतून सर्वपक्षीय नेत्यांकडून संताप देखील व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, बीडमध्ये (Beed Crime) मोर्चा निघाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला (CID) दिले होते. आज या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींच्या मालमत्तेची माहिती गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या प्रशासनाने संबंधित आरोपींच्या मालमत्तेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून फरार आरोपींची मालमत्ता जप्त केली जाणार आहे.
हत्याकांडातील मुख्य फरार आरोपी
सुदर्शन चंद्रभान घुले (26 वर्ष, रा. टाकळी) कृष्णा शामराव आंधळे (27 वर्ष मैंदवाडी ता. धारूर), सुधीर सांगळे (रा. टाकळी) अशी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची नावे आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात होणार
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. शिवाय त्यापूर्वी त्यांचे अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, या हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून ते अद्याप फरार आहेत. पोलिसांना फरार आरोपींचा शोध घेण्यास अपयश आले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर आता सीआयडीकडून फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात झाली आहे.
विरोधी पक्षाकडून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप
जितेंद्र आव्हाड यांनी आकाचा बाप कोण आहे? असा प्रश्न विचारत एवढी जनता सांगते तरी त्याला मंत्री मंडळात कशाला ठेवलंय असं म्हणत धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत..तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय असं म्हणत टीका केली आहे. धनंजय मुंडे खरंच सत्यवादी असतील तर त्यांनी राजीनामा फेकून चौकशीला सामोरं जावं, असं आव्हानही सोनवणे यांनी दिलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
हा बडा नेता कोण? अंजली दमानियांचा सवाल; स्कॉर्पिओमधील 2 मोबाईल अन् व्हिडिओचा दाखला