एक्स्प्लोर

Pankaja Munde : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पंकजा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Pankaja Munde on Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.

Pankaja Munde on Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग येथील सरपंचाचा खून (Santosh Deshmukh Murder Case) आणि परळीतील तरूण व्यापाऱ्याचे झालेले अपहरण हा प्रकार अतिशय गंभीर असून या दोन्ही घटनांचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे व्हावा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे. जिल्ह्यात घडणाऱ्या अशा घटनांविषयी आ. पंकजा मुंडेंनी चिंता व्यक्त केली असून याविषयी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी आपण स्वतः चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विशेष तपास यंत्रणेद्वारे व्हावा, पंकजा मुंडेंची मागणी 

मस्साजोग ता. केज येथील माजी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांचा खून  झाल्याची घटना नुकतीच घडली. त्याचप्रमाणे परळी येथील तरूण व्यापारी अमोल डुबे यांचं काल रात्री काही लोकांनी अपहरण करून लूटमार केली याबाबत माहिती प्राप्त झाली. या दोन्ही घटनांबरोबरच जिल्ह्यात अलिकडच्या काळात घडलेल्या घटना चिंताजनक आहेत पोलिसांनी या दोन्ही घटनांची स्पेशल इन्व्हिस्टीगेशन टीमद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी करून आ. पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत याबद्दल संताप व्यक्त केला आहे . याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे निलंबन 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत रस्ता रोको करत असलेल्या ग्रामस्थांची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि  बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यात आली. आरोपींसोबत हितसंबंध असल्याचा आरोप केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर करण्यात आला होता. बीडचे एस पी अविनाश बारगळ यांनी राजेश पाटील यांच्या तडकाफडकी निलंबन केलं आहे.. केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल सुद्धा वरिष्ठांना पाठवणार असल्याचे सांगितले आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर देशमुख खून प्रकरणातील ठिय्या आंदोलन मागे 

बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मसाजोग ग्रामस्थांसह देशमुख कुटुंबीयांकडून सकाळपासून तब्बल 12 तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले.

आंदोलन चिघळू नये म्हणून स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी पाच तास आंदोलकांमध्ये सहभाग घेऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ आंदोलन स्थळी दाखल झाले. आणि पाच तासानंतर पोलीस प्रशासन आणि जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ठिय्या मागे घेऊन देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Indapur Accident : ट्रक चालकाने मागून ठोकल्याने दहा ते बारा वाहनं एकमेकांवर आदळली, इंदापुरात विचित्र अपघात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Embed widget