Indapur Accident : ट्रक चालकाने मागून ठोकल्याने दहा ते बारा वाहनं एकमेकांवर आदळली, इंदापुरात विचित्र अपघात
Indapur Accident : ट्रक चालकाने मागून ठोकल्याने इंदापुरात विचित्र अपघात झालाय.
Indapur Accident : इंदापूर तालुक्यातील (Indapur Accident) डाळज नंबर 1 येथे बगॅस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पुणे सोलापूर मार्गावर पलटी झाला. या पलटलेल्या ट्रॉली उचलण्यासाठी जेसीबीची (JCB) मदत घेत असताना एका बाजूने धीम्या गतीने वाहतूक सुरु होती. अशातचं पुण्याकडून (Pune) सोलापूरकडे (Solapur) भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने पाठीमागून जोरात धडक दिल्याने दहा ते बारा वाहनांची एकमेकांना धडक बसलीय. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडलीय.
सुदैवाने यात कोणतीही जीवीतहाणी झाली नाही
अधिकची माहिती अशी की, या अपघातात दहा ते बारा वाहनांच नुकसान झाले असून महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने पाठीमागून वेगात येऊन पुढील वाहनांना जोरात धडक दिल्याने दहा ते बारा वाहने एकमेकांना धडकून अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहाणी झाली नाही.
अलिबागमध्ये हिट अँड रनची पुनरावृत्ती
अलिबाग रेवस मार्गावर चोंढी गावाजवळ भरधाव अलिशान बीएमडब्ल्यू कार गॅरेजमध्ये घुसल्याची घटना घडली आहे. गॅरेजमध्ये काम करत असलेल्या मेकॅनिकसह 2 ग्राहकांना कारने धडक दिली आहे. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. बीएमडब्ल्यू कार चालकाचा बेजबाबदारपणा समोर आलाय. अलिबागमधील आज संध्याकाळची घटना समोर आली आहे. अलिबाग रेवस मार्गावरील हॉटेल साई इन हॉटेल जवळील डे-फार्म जवळ प्रकार घडला. बीएमडब्ल्यू कार चालकासह जखमी गॅरेज मालक आणि इतर दोघे ही अलिबाग तालुक्यांतीलच रहिवाशी आहेत. जखमींवर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. बीएमडब्ल्यू कार चालक संदीप विलास गायकवाड(वय 41,रा. चोंढी- अलिबाग जि. रायगड) यांच्या विरोधात अलीबागच्या मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Justice Is Due, 34 वर्षीय senior executive ची 24 पानांची सुसाईड नोट, पत्नीच्या जाचाला कंटाळून गळ्याला दोर लावलाhttps://t.co/WzOKiCsKH5
— ABP माझा (@abpmajhatv) December 10, 2024
वंचितच्या उमेदवाराने स्वतःवरच हल्ला करून घेतला, निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी बनाव रचल्याचं उघडhttps://t.co/5wTL8U53YT#DilipMhaske #Hingoli #kalamnuri #VBA #PrakashAmbedkar
— ABP माझा (@abpmajhatv) December 10, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या