एक्स्प्लोर

गोपीनाथ मुंडेंच्या आठव्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर, विधानपरिषद निवडणुकीबाबत पंकजा मुंडे काय बोलणार?

गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे. यावेळी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन उद्या 3 जून रोजी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक उद्या गोपीनाथ गडावर येणार आहेत. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात स्मृतिदिनाला समर्थकांना गोपीनाथ गडावर यायला मिळालं नव्हतं. आता दोन वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी उद्या मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहेत.

गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू
3 जून 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय मंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात परत येण्यासाठी 3 जून रोजी सकाळी आपल्या गाडीतून दिल्ली विमानतळावर जात असताना गाडीचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांना त्वरीत एम्समध्ये दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान सकाळी सात वाजून 20 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. 

पंकजा मुंडे काय बोलणार?
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणार का यासंदर्भात मुंडे समर्थकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळेच गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यापूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांनी भाजपकडून सगळी तयारी केली होती. मात्र ऐनवेळी पक्षाने पंकजा मुंडे यांची उमेदवारी नाकारली आणि रमेश कराड यांना उमेदवारी दिली. यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या. गोपीनाथ गडावरुन आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी पंकजा मुंडे यांना मिळणार का याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार, कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

असे असतील उद्याचे कार्यक्रम!
सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा वाजाता ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यानंतर दर वेळेप्रमाणे समाजातील वंचित, पीडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. सर्व आजी माजी आमदार, खासदार, मान्यवर नेते मंडळी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Embed widget