एक्स्प्लोर

Navneet Kanwat : काल मुख्यमंत्र्यांकडून बदलीची घोषणा, आज अविनाश बारगळांची उचलबांगडी, नवनीत कांवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक

Navneet Kanwat : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा देखील केली होती.

बीड : जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणी आज उठवला आहे. या प्रकरणी सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात कुचराई केल्याचे सांगितले. तसेच बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदल करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा देखील त्यांनी केली होती. या घोषणेला 24 तास उलटत नाही तोच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवनीत कांवत (Navneet Kanwat) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

बीडमध्ये गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बीडमधील कायदा-सुव्यवस्था सुधरायची असेल तर आयपीएस अधिकाऱ्याची करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यातच बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण संपूर्ण राज्यभरात चर्चेत आले आहे. यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली होती. या घोषणेनंतर 24 तासातच नवीन जिल्हा पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या नवनीत कावत यांना आता बीड जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले की, बीडच्या प्रकरणात ज्यांचा समावेश असेल, मग तो भूमाफिया असेल, तरी त्यांच्यावर मकोका लावू. मी पोलिस महासंचालकांना देखील सांगितले की, यात पोलिस प्रशासनाचाही दोष आहे. पोलिसांनी देखील फिर्याद नोंदवल्यावर त्याची वस्तुस्थिती काय, हे बघायला पाहिजे. मधल्या काळात हे निर्ढावलेले अशा प्रकारचे काम करताना दिसतात. हे यापुढे सहन केले जाणार नाही, हे मी सभागृहाला आश्वस्त करतो. या प्रकरणात दोन प्रकारे चौकशी आम्ही करणार आहोत. एक म्हणजे पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांतर्गत एसआयटी चौकशी केली जाईल. दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल. ही चौकशी तीन ते सहा महिन्यात पूर्ण करू. जी प्रकरणे समोर येत आहेत, त्या सगळ्या प्रकरणात पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे, असे त्यांनी म्हटले होते. 

कोण आहेत बीडचे नवे SP नवनीत कांवत? 

नवनीत कांवत हे 2017 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे राजस्थानचे असून त्यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत. कांवत यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण मुरादाबादमध्ये झालं. सहावी ते 12 वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगढ इथे झालं. ते शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते. वडिलांनी त्यांना एक आव्हान दिलं आणि नवनीत यांनी दहावी, 11 वी आणि 12 वी या तीन वर्षात सैनिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. स्वत:वर विश्वास ठेवून त्यांनी दहावीत अव्वल क्रमांक पटकावला. 12 वीनंतर नवनीत यांनी आयआयटीमध्ये प्रवेश केला, तिथे त्यांनी बी टेक केलं. त्यांची आई शिक्षिका, वडील रेल्वेत होते, त्यांनी लहानपणापासून अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले जात होते, पण नवनीत यांचा ओढा खासगी क्षेत्रात होता. नवनीत यांनी IIT मधून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर डिजाईन इंजिनिअर म्हणून एका खासगी कंपनीत नोकरी केली. यादरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले. तिथे त्यांनी अभ्यास करुन ते 2017 मध्ये IPS अधिकारी बनले. 

आणखी वाचा 

शरद पवार बजरंग बाप्पांना घेऊन बीडच्या मस्साजोग गावात पोहोचले, संतोष देशमुख हत्याप्रकरणात काय बोलणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09PM 09 March 2025Special Report | Pune NCP Protest | पोलिसांची लाठी, पक्षाकडून हकालपट्टी; कार्यकर्ते मेट्रो ट्रॅकवरUddhav Thackeray Full Speech : उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी..!RSS,भाजप ते एकनाथ शिंदे; डागली तोफJOB Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदावर जागा? 09 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
Embed widget