Dhananjay Munde Beed: वाल्मिक कराडला मकोका लागताच बीडमध्ये अजितदादांचा सर्जिकल स्ट्राईक; धनंजय मुंडेंना मोठा धक्का?
NCP Action: बीड जिल्ह्यातील घडामोडीनंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय घेतला आहे, पक्षाची कार्यकारणी बरखास्त केली असून हा धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणात मोठे राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच या हत्या प्रकरणात असलेला आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष होता, तर या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवला जात असल्याचा वाल्मिक कराडचे (Walmik Karad) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी जवळचे संबंध आहेत, त्यामुळे आता पक्षाकडून मोठा निर्णय घेण्याच आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.
चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना
राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे (Vishnu Chate) याच्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे (Vishnu Chate) याच नाव आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. यामुळेच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
धनंजय मुंडे यांना हा मोठा धक्का?
जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कार्यकारणी बरखास्त केल्यामुळे धनंजय मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता ही मोठी घडामोड घडली आहे. त्याचबरोबर यापुढे पक्षात केल्या जाणाऱ्या तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना देखील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडून देण्यात आल्याची माहिती आहे.
त्यामुळे आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा कोणत्याही गुन्ह्याच्या घटनेमध्ये सहभागी झालेले लोक असतील त्यांना पदापासून दूर ठेवलं जाईल अशी मानसिकता पक्षाची दिसून येत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पक्षातील नेत्यांवर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले होते, त्याचबरोबर मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. धनंजय मुंडेंवरती सवाल उपस्थित केले गेले. वाल्मिक कराडशी असलेला संबंध आणि इतर घडामोडींच्या पार्श्वभूमीनंतर आता पक्षाकडून मोठी खबरदारी घेतली जात आहे.