एक्स्प्लोर

सतरंजीने हायपाय बांधून मारले, पैसेही लुटले; बीडच्या SP कडून टोळीवर मोक्का, चौघांना अटक

बीड पोलिसांनी येथील वॉचमला मारहाण करत चोरी टकरणाऱ्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.

बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवायाच्या घटनांवर पोलिसांकडून (Police) कडक कारवाई केली जात आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर, राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत येथील पोलीस अधीक्षकांची बदली केली. त्यामुळे, येथे नवनीत कावत या नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस अधीक्षकांकडे बीडची (Beed) जबाबदारी देण्यात आली. कावत यांनी बीडमधील गुन्हेगारांवर वचक बसवत थेट मोक्काअंतर्गत कारवाईला सुरुवात केली आहे. वाल्मिक कराड आणि गँगवर मोक्का (macoca) लावल्यानंतर आता केज तालुक्यातील विडा येथे अवादा पवनचक्की कंपनीच्या वॉचमनला मारहाण करणाऱ्या टोळीवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

बीड पोलिसांनी येथील वॉचमला मारहाण करत चोरी टकरणाऱ्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. 7 एप्रिल रोजी वॉचमन अभिजीत दुनघव या वॉचमनला सतरंजीने हात पाय बांधत रोटर केबल, स्टार्टन केबल, अर्थिंग केबल असे एकूण 12 लाख 87 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणातील आरोपी बबन सरदार शिंदे, धनाजी रावजी काळे, मोहन हरी काळे, लालासाहेब सखाराम पवार असे 4 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते. तसेच या गुन्ह्यात इतर 6 आरोपी निष्पन्न झाले असून ते अद्याप फरार आहेत, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात बीड व धाराशिव जिल्ह्यात संघटित रित्या केज, नेकनूर, ढोकी, वाशी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे, आता या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. 

आता, या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव बीड बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी वीरेंद्र मिश्रा विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांना पाठवला होता, या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या चोरी प्रकरणी 10 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याआधी बीड मधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी बीड पोलिसांनी आतापर्यंत चार टोळींवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. त्यामध्ये, वाल्मिक कराडसह विष्णू चाटे आणि त्यांच्या गँगवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सध्या वाल्मिक कराड आणि गँग तुरुंगात आहे. 

हेही वाचा

... तर पाकिस्तानचे 4 तुकडे होतील; संरक्षणमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा, INS विक्रांतवरुन ठणकावलं

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील दूध संकलन एका महिन्यात तब्बल 1 लाख लिटरने घटलं; सर्वाधिक घट बीड जिल्ह्यात, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका?
मराठवाड्यातील दूध संकलन एका महिन्यात तब्बल 1 लाख लिटरने घटलं; सर्वाधिक घट बीड जिल्ह्यात, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका?
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय

Embed widget