एक्स्प्लोर

Beed News : कांद्यानं शेवटी रडवलंच! बीडमधील शेतकऱ्याचा कांद्याला मिळाला फक्ता एक रुपयाचा भाव

Beed News : बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील तरुण शेतकरी वैभव शिंदे यांनी दोन एकरावर कांद्याची लागवड केली होती. पण बाजारपेठेत कांदा विकायला घेऊन गेल्यानंतर तिथे त्यांच्या कांद्याला एक रुपये किलो प्रमाणे कांद्याला भाव मिळाला.

बीड : कांदा निर्यातबंदी (Onion Export Duty) निर्णय जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर उमटू लागले. दरम्यान यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत देखील वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं. पण या कांद्यामुळे अखेर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलच. कारण बीडमधील (Beed) नेकनूर येथील एका तरुण शेतकऱ्याच्या कांद्याला सोलापूरच्या बाजारपेठेत चक्क एक रुपयाचा भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्याला उरलेला कांदा हा शेतामध्येच बांधावर फेकून द्यावा लागला. 

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील तरुण शेतकरी वैभव शिंदे यांनी दोन एकरावर कांद्याची लागवड केली होती. जेव्हा कांदा विक्रीसाठी आला तेव्हा ते तो कांदा घेऊन सोलापूरच्या बाजारपेठेत विकायला घेऊन गेले. पण बाजारपेठेत कांदा विकायला घेऊन गेल्यानंतर तिथे त्यांच्या कांद्याला एक रुपये किलो प्रमाणे कांद्याला भाव मिळाला. त्यामुळे त्यांना त्यांचा उर्वरित कांदा देखील शेतामध्येच बांधावर फेकून देण्याची वेळ आली.

कांदा निर्यात बंदीची शेतकऱ्यांना फटका

वैभव शिंदे यांनी 80 हजार रुपये खर्च करून दोन एकरावर कांद्याची लागवड केली होती. यामधून त्यांना चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना होती. पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. कांद्याची निर्यात बंद झाल्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले. त्यातच त्यांनी  एक टन कांदा हा सोलापूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेला. त्यावेळी कांद्याला एक रुपयाचा भाव मिळाला. त्यामुळे त्यांनी पदरचे दोन हजार रुपये खर्च करावे लागले. तसेच त्यांनी उरलेला कांदा हा विक्रीसाठी परवडत नसल्यामुळे  शेताच्या बांधावर फेकून दिला. 

निर्यातबंदीमुळे कांद्याच्या भावात घसरण

केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानं घाऊक भावात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळं किरकोळ बाजारातही कांद्याचे भाव घसरले आहेत. महाराष्ट्रातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या सरासरी घाऊक भावात घसरण झाली. बाजारात कांद्याच्या घाऊक दरात सुमारे 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. येत्या काही दिवसात कांद्याच्या भावात आणखी घसरण होऊ शकते असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटली

केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर 7 डिसेंबरपासून घसरण सुरु झाली आहे. 6 डिसेंबर रोजी कांद्याचा सरासरी घाऊक भाव प्रतिक्विंटल 3900 रुपये इतका नोंदवला गेला. आता गेल्या 15 दिवसांत दर जवळपास 50 टक्क्यांनी घसरले आहेत. एपीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, निर्यातबंदीमुळे कांद्याची मागणी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

हेही वाचा : 

नोकऱ्या महाराष्ट्रात, भरती परप्रांतियांची; इन्कम टॅक्समध्ये 1200 पैकी फक्त 3 मराठी, सरकारला मुंबईत उत्तर भारतीयांची कार्यालयं थाटायची आहेत का? अरविंद सावंतांचा सवाल

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil Hindustani Bhau Controversy: 'दहा वेळा उपोषण झालंय, बाथरुममध्ये जाऊन खातो हा... तंबाखू खातो, सलाईन चढतंय'; 'हिंदुस्थानी भाऊ' मनोज जरांगेंबाबत नको नको ते बोलला
'दहा वेळा उपोषण झालंय, बाथरुममध्ये जाऊन खातो हा... तंबाखू खातो, सलाईन चढतंय'; 'हिंदुस्थानी भाऊ' मनोज जरांगेंबाबत नको नको ते बोलला
Manoj Jarange Beed: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा, म्हणाले...
Manoj Jarange Patil Father emotional: मनोज जरांगेंचे वडील थकून झोपलेल्या लेकाकडे एकटक पाहत बसले, मग खाली वाकून मायेने कवटाळताच अश्रूंचा बांध फुटला
मनोज जरांगेंचे वडील थकून झोपलेल्या लेकाकडे एकटक पाहत बसले, मग खाली वाकून मायेने कवटाळताच अश्रूंचा बांध फुटला
Manoj Jarange Patil Hindustani Bhau Controversy: 'मनोज जरांगे, गेल्यावेळेस आलात, धिंगाणा केला , मुंबईत घाण केली, यावेळीही...'; 'हिंदुस्थानी भाऊ'चं मराठा आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य
'मनोज जरांगे, गेल्यावेळेस आलात, धिंगाणा केला , मुंबईत घाण केली, यावेळीही...'; 'हिंदुस्थानी भाऊ'चं मराठा आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
Bhagyashree : भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
Donald Trump : भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार?अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार? अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
Embed widget