एक्स्प्लोर

Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही

Beed Crime: बँकेचं खातं गोठवलं, संपत्तीही जप्त होण्याची चिन्हं, आर्थिक नाकेबंदीमुळे वाल्मीक कराड याच्यासमोर कोणताही पर्याय उरला नसल्याचे सांगितले जाते.

बीड: पवनचक्की मालकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप आणि संतोष देशमुख प्रकरणात रडारवर असलेल्या वाल्मीक कराड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीकडून सध्या वेगाने तपास सुरु आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी वाल्मीक कराड यांच्याशी संबंधित महिलांची विविध पोलीस ठाण्यात बसवून चौकशी केली. याप्रकरणात आतापर्यंत 100 जणांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये वाल्मीक कराडच्या अनेक निकटवर्तीयांचा समावेश आहे. या सगळ्यामुळे वाल्मीक कराड याच्यावरील दबाव वाढला असून तो कोणत्याही क्षणी पोलिसांसमोर शरणागती पत्कारेल, असे सांगितले जात आहे. 

संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 21 दिवस उलटले आहेत. तेव्हापासून वाल्मीक कराड फरार आहेत. मात्र, सीआयडी पथकाने अलीकडेच वाल्मीक कराड यांचे बँक खाते गोठवले होते. याशिवाय, वाल्मीक कराड यांची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालायकडून परवानगी मिळवण्याच्या हालचालीही सुरु झाल्या होत्या. तसेच वाल्मीक कराड यांच्याकडे पासपोर्ट नाही. त्यामुळे त्यांना देशाबाहेर पळून जाणेही शक्य नाही. सीआयडीच्या पथकांनी कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरु केल्याने त्यांच्यावरील मानसिक दबावही वाढला आहे. याशिवाय, बँक खाती गोठवून केलेल्या आर्थिक नाकेबंदीमुळे वाल्मीक कराड याच्यासमोर आता कोणताही पर्याय उरला नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच आता वाल्मीक कराड सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण येईल, असे सांगितले जात आहे. 

वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना कार्यकर्ता आहे. धनंजय मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्रे वाल्मीक कराड यानेच हाताळल्याचे सांगितले जाते. वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरुनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, असा आरोप होत आहे. बीडमधील सर्वपक्षीय नेत्यांनी वाल्मीक कराड याच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे हेदेखील अडचणीत आले आहेत. वाल्मीक कराड कनेक्शनमुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. 

CID पथक आज कोणाला चौकशीला बोलावणार? 

बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपास करत आहे. सीआयडीचे एकूण नऊ पथकं या प्रकरणाचा तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी सीआयडीच्या पथकाने केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मनी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या पत्नीची देखील चौकशी करण्यात आली आहे. तर वाल्मीक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी दोन महिलांची देखील काल सीआयडीच्या पथकाने चौकशी केली. आज देखील चौकशीचे हे सत्र सुरू राहणार असल्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा

प्राजक्ता माळी आरएसएसच्या मुख्यालयात जातात तेव्हा...; सुषमा अंधारेंच्या विधानाने चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : खंडणी मागताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा; वाल्मिक कराडचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर
खंडणी मागताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा; वाल्मिक कराडचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर
Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार; अवादा कंपनीला खंडणी मागितली त्यातून झालेल्या वादानंतर हत्येचा कट
वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार; अवादा कंपनीला खंडणी मागितली त्यातून झालेल्या वादानंतर हत्येचा कट
Uttarakhand Avalanche : बद्रीनाथजवळ झालेल्या हिमस्खलनातून आतापर्यंत 47 कामगारांचा बचाव, अजूनही 8 जणांचा शोध सुरुच
बद्रीनाथजवळ झालेल्या हिमस्खलनातून आतापर्यंत 47 कामगारांचा बचाव, अजूनही 8 जणांचा शोध सुरुच
kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी, आता गटविकास अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, ग्रामसभेतील 'तो' ठराव केला रद्द
कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी, आता गटविकास अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, ग्रामसभेतील 'तो' ठराव केला रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case Walmik Karad Exposed : संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मीक कराडचABP Majha Marathi News Headlines 11.30 AM TOP Headlines 11.30 AM 01 March 2025HSRP Number Plate : राज्यात एचएसआरपी नंबर प्लेटचा वाद, तिप्पट वसुलीचा आरोपABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 01 March 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : खंडणी मागताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा; वाल्मिक कराडचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर
खंडणी मागताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा; वाल्मिक कराडचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर
Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार; अवादा कंपनीला खंडणी मागितली त्यातून झालेल्या वादानंतर हत्येचा कट
वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार; अवादा कंपनीला खंडणी मागितली त्यातून झालेल्या वादानंतर हत्येचा कट
Uttarakhand Avalanche : बद्रीनाथजवळ झालेल्या हिमस्खलनातून आतापर्यंत 47 कामगारांचा बचाव, अजूनही 8 जणांचा शोध सुरुच
बद्रीनाथजवळ झालेल्या हिमस्खलनातून आतापर्यंत 47 कामगारांचा बचाव, अजूनही 8 जणांचा शोध सुरुच
kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी, आता गटविकास अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, ग्रामसभेतील 'तो' ठराव केला रद्द
कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी, आता गटविकास अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, ग्रामसभेतील 'तो' ठराव केला रद्द
Volodymyr Zelenskyy Vs Donald Trump : रशिया आमच्यासाठी खुनी! डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्षांना झेलेन्स्की भिडताच अवघा युरोप आता पाठिंब्यासाठी एकवटला; कॅनडा सुद्धा धावून आला
रशिया आमच्यासाठी खुनी! डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्षांना झेलेन्स्की भिडताच अवघा युरोप आता पाठिंब्यासाठी एकवटला; कॅनडा सुद्धा धावून आला
Video : खनिजांचा सौदा दूरच राहिला, पण झेलेन्स्की डोळ्यात डोळे घालून डोनाल्ड ट्रम्प यांना भिडले, व्हाईट हाऊसमध्ये 56 इंच छाती दाखवली!
Video : खनिजांचा सौदा दूरच राहिला, पण झेलेन्स्की डोळ्यात डोळे घालून डोनाल्ड ट्रम्प यांना भिडले, व्हाईट हाऊसमध्ये 56 इंच छाती दाखवली!
Ajit Pawar : अरे इथं शिस्तचं नाही, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात अजितदादांनी टोचले उपस्थितांचे कान; नेमकं काय घडलं?
अरे इथं शिस्तचं नाही, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात अजितदादांनी टोचले उपस्थितांचे कान; नेमकं काय घडलं?
Nashik Crime : भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
Embed widget