(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed : सतत दारू पिऊन मारहाण; बीडमध्ये पत्नीने केली पतीची हत्या, आत्महत्येचा बनाव करत पोलिसांना म्हणाली…
Beed News : वैष्णवीने पतीचा मृतदेह घराच्या छताला लटकवला आणि त्याने आत्महत्या केल्याचा बनाव करत त्याच्या मृत्यूची माहिती स्वतः पोलिसांना दिली..
बीड : दोन दिवसापूर्वीच बीडच्या (Beed) गेवराईमध्ये एका नवविवाहित पत्नीने आपल्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि त्यानंतर आता परळी तालुक्यातल्या शिरसाळ्यात देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीरसाळ्यातला गोवर्धन हिवरा येथे दारू पिऊन आलेल्या पतीसोबत पत्नीच भांडण झालं आणि याच भांडणातून पत्नीने दोरीने आपल्या पतीचा गळा आवळून खून केला आहे..
हनुमान काकडे असं 30 वर्षीय मयत तरुणाचे नाव असून रात्री हनुमान हा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याचे पत्नी वैष्णवी सोबत जोराच भांडण झालं याच भांडणाचा राग मनात धरून वैष्णवीने हनुमानचा गळा आवळून त्याची हत्या केली. हनुमानचा मृत्यू झाल्यानंतर वैष्णवीने त्याचा मृतदेह घराच्या छताला लटकवला आणि त्याने आत्महत्या केल्याचा बनाव करत त्याच्या मृत्यूची माहिती स्वतः पोलिसांना दिली..
हनुमान काकडे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्याचा गळा आवळून खून झाल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास केला असता हनुमानची पत्नी वैष्णवी हिनेच त्याचा गळा आवळून खून केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर पोलिसांनी वैष्णवीला ताब्यात घेतला असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पती आवडत नसल्यानं 21 दिवसात पत्नीकडून पतीची हत्या
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील पांडुरंग रामभाऊ चव्हाण या 22 वर्षीय तरुणाचा काही दिवसापूर्वीच विवाह झाला होता. 7 नोव्हेंबर रोजी रात्री पांडुरंग यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना गेवराईच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मात्र अचानक त्याचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी गेवराई पोलिस ठाण्यामध्ये त्याच्या पत्नीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. संशयावरून पोलिसांनी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतलं होतं. कसून चौकशी केल्यानंतर तिने हत्येची कबुली दिली आहे. परंतु, स्वत: गळा दाबून हत्या केली आणि हृदयविकारानेच त्यांचा मृत्यू झाला असा बनाव करण्यात आला होता. परंतु, अवघ्या आठ दिवसाच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत पत्नीनेच खून केल्याचे उघड केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :