एक्स्प्लोर

पती आवडत नसल्यानं 21 दिवसात पत्नीकडून पतीची हत्या,  बीडच्या गेवराईमधील धक्कादायक घटना

Beed Crime News : लग्नानंतर केवळ 21 दिवसात पत्नीने पतीची हत्या केली.  बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

Beed Crime News : पती आवडत नसल्यानं लग्नानंतर 21 दिवसात पत्नीकडून पतीची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.  बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये (Beed Crime News) ही धक्कादायक घटना घडली आहे. 8 नोव्हेंबर रोजी गेवराईमधील पांडुरंग चव्हाण यांची हत्या झाली होती. हत्येनंतर पांडुरंग यांच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयावरून त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी सुरू होती. अखेर आज संशयित पत्नीने पोलिसांना आपणच पांडुरंग यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आलाय. शीतल चव्हाण असं संशयित आरोपी पत्नीचं नाव आहे. गेवराई पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झालाय. 

बीडमधील गेवराई तालुक्यामधील निपाणी जवळका येथील पांडुरंग चव्हाण या तरुणाचा विवाह शितल या तरुणीशी 14 नोव्हेंबर रोजी झाला होता. मात्र लग्नापासूनच शितलला पांडुरंग पसंद नसल्याने त्यांच्यात घरामध्ये सतत वाद होत असत. पांडुरंगच्या कुटुंबीयांनी अनेक वेळा शीतलची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र शितलच्या वागण्यात काही बदल न झाला नाही, असं पांडुरंग याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. 
 
8 नोव्हेंबर रोजी पांडुरंग याला अस्वस्थ वाटू लागल्याने गेवराईच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून त्याच्या गळ्यावर काही व्रण असल्याची माहिती पोलिसांना दिली. यावरून आणि पांडुरंगच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून त्याची पत्नी शीतल हिच्या विरोधात गेवराई पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि संशयित शितलला पोलिसांनी ताब्यात घेतलां होतं.
 
गेवराई पोलिसांनी शीतल हिला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडे कसून चौकशी केली असता तीनेच आपल्या पतीची हत्या केल्याचं कबूल केलं. शितलने  मध्यरात्री पती पांडुरंग याचा गळा दाबून त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव करत रुग्णालयात दाखल केलं असल्याचं पोलिसांना सांगितलं.

हृदयविकाराचा बनाव 

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील पांडुरंग रामभाऊ चव्हाण या 22 वर्षीय तरुणाचा काही दिवसापूर्वीच विवाह झाला होता. 7 नोव्हेंबर रोजी रात्री पांडुरंग यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना गेवराईच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मात्र अचानक त्याचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी गेवराई पोलिस ठाण्यामध्ये त्याच्या पत्नीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. संशयावरून पोलिसांनी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतलं होतं. कसून चौकशी केल्यानंतर तिने हत्येची कबुली दिली आहे. परंतु, स्वत: गळा दाबून हत्या केली आणि हृदयविकारानेच त्यांचा मृत्यू झाला असा बनाव करण्यात आला होता. परंतु, अवघ्या आठ दिवसाच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत पत्नीनेच खून केल्याचे उघड केले. 

महत्वाच्या बातम्या

20 पथकांचे 75 तासांचं सर्च ऑपरेशन, पोलिसांनी 12 वर्षाच्या रुद्रची केली सुटका, पाच जणांना ठोकल्या बेड्या 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget