(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shraddha Murder Case : श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब गुगलवर काय सर्च करत होता? पोलिसांनी केला मोठा खुलासा
Shraddha Murder Case : प्रेयसी श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी आफताबने गुगलवर काही सर्च केले होते. नेमकं काय सर्च केलं होतं आफताबने?
Shraddha Murder Case : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणी(Shraddha Murder Case) एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे. आता या प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे, प्रेयसी श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी आफताबने गुगलवर (Google) काही सर्च केले होते. नेमकं काय सर्च केलं होतं आफताबने? पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
Shraddha murder case: Aftab googled blood cleaning method, human anatomy after murdering live-in partner
— ANI Digital (@ani_digital) November 14, 2022
Read @ANI Story | https://t.co/KI0LC0ktOk#AftabPoonawalla #ShraddhaMurderCase #DelhiMurderCase pic.twitter.com/vkZHaOivRY
नेमकं काय सर्च केलं होतं आफताबने?
वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब याने हत्या केल्यानंतर गुगलवर रक्त कसे स्वच्छ करावे याबद्दल सर्च केले. याशिवाय आफताबने गुगलवर मानवी शरीराबाबतही सर्च केले होते. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत असे समोर आले आहे की, आफताबने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केली होती आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली होती. आफताबने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने गुगलवर मानवी शरीर रचनेबाबत वाचून श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले होते.
Shraddha Murder case|Delhi Police may write to Bumble to get details of Aftab's profile to find details of women who visited him in his house when body was still in refrigerator. Police looking at possibility if any of these women could be a reason behind this killing: DP Sources
— ANI (@ANI) November 15, 2022
...आणि त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, गुगल सर्च केल्यानंतर त्यांनी श्रद्धाच्या रक्ताचे डाग जमिनीवरून साफ केले. यासाठी आफताबने केमिकलचा वापर करून घाणेरडे कपडे फेकून दिले. यानंतर त्यांनी श्रद्धाचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला आणि जवळच्या दुकानातून फ्रीज विकत घेतला. नंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले.
आफताब रोज त्याच खोलीत झोपायचा
दरम्यान, दिल्ली पोलिसांना श्रद्धाच्या वडिलांकडून तक्रार मिळाल्यानंतर 10 नोव्हेंबरला एफआयआर नोंदवण्यात आला. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत होते. पोलिसांनी सांगितले की, आफताब रोज त्याच खोलीत झोपायचा जिथे त्याने श्रद्धाचे अनेक तुकडे केले होते. फ्रीजमधून सर्व अवयव फेकून दिल्यानंतर आफताबने फ्रीजही साफ केला.