धक्कादायक! अत्याचार करून अल्पवयीन मुलीला विषारी औषध पाजले; बीड जिल्ह्यातील घटना
Beed Crime News : याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री पीडितेच्या फिर्यादीवरून तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड: जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, अत्याचार करून अल्पवयीन मुलीला विषारी औषध पाजण्यात आले आहे. आरोपीने यापूर्वी देखील पिडीत मुलीवर अनेकदा अत्याचार केले होते. मात्र, आठ दिवसांपूर्वी त्याने अत्याचार करून पिडीत मुलीला विषारी औषध देखील पाजले होते. तर, तेव्हापासून हा आरोपी फरार झाला होता. मात्र, बीड पोलिसांनी रविवारी अखेर त्याला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला एक वर्षापासून जिवे मारण्याची धमकी देत आरोपीने मुलीवर अनेक वेळा अत्याचार केला. आठ दिवसांपूर्वी अत्याचार करून अल्पवयीन मुलीला विषारी औषध पाजले. ही घटना आष्टी तालुक्यातील एका गावात आठ दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणातील आरोपी तेव्हापासून फरार झाला होता. दरम्यान रविवारी सायंकाळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पीडितेच्या फिर्यादीवरून तरुणावर गुन्हा दाखल
आष्टी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याच्या उद्देशाने तिच्या कुटुंबाला वर्षभर जिवे मारण्याच्या धमक्या देत मुलीवर बळजबरीने अत्याचार करण्यात आला. दरम्यान, आरोपीने 7 ऑक्टोबरच्या रात्री एकच्या सुमारास मुलीवर पुन्हा बळजबरी अत्याचार केला. त्यानंतर जिवे मारण्याच्या उद्देशाने तिला विषारी औषध पाजले. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री पीडितेच्या फिर्यादीवरून तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपीफरार झाला होता.
पोलिसांनी सापळा लावून घेतलं ताब्यात....
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर, पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, पिंक पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक धरनीधर कोळेकर यांनी भेट दिली होती. दरम्यान, 7 ऑक्टोबरपासून फरार असलेला आरोपी रविवारी सायंकाळी कडा येथील महेश मंदिराजवळ येणार असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.
गावातीलच अल्पवयीन मुलीचा विनयभंग
दुसऱ्या एका घटनेत शिरूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा गावातीलच एका जणाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत मुलीच्या आजोबांनी केला होता. तसेच जिल्हाधिकारी यांना न्याय मिळण्यासाठी निवेदन दिले होते. या प्रकरणी अखेर आरोपी बाबू लक्ष्मण कावळे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीचे आजोबा बाहेर गेल्यानंतर आरोपी बाबू लक्ष्मण कावळे हा घरी आला आणि त्याने अंघोळ करत असलेल्या अल्पवयीन मुलीचा हात धरून तुला फिरायला नेतो, पैसे देतो म्हणत ओढाताण करत मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पोलिस कर्मचाऱ्यासह सख्ख्या भावाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार