एक्स्प्लोर

Pune crime Ayush Komkar: पोलिसांना वाटलं गँगवॉर संपलं, पण गुन्हेगारी कोळून प्यायलेल्या बंडू आंदेकरने सगळ्यांचाच अंदाज चुकवला अन् रक्ताचा सडा पसरला

Ayush Komkar Pune Crime: पुण्यात 5 सप्टेंबरला रात्री नाना पेठेत आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली. आंदेकर टोळीच्या मारेकऱ्यांनी 9 गोळ्या घालून 19 वर्षांच्या आयुषला जागेवरच संपवलं

Pune crime Bandu Andekar: पुण्यात गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आंदेकर टोळीच्या मारेकऱ्यांनी आयुष कोमकर (वय 19) याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. गेल्यावर्षी पुण्यात आंदेकर कुटुंबातील मालमत्तेच्या वादातून वनराज आंदेकर याची हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणात वनराज आंदेकर (Vanraj Andekar Murder) याच्या बहिणी आणि त्यांच्या सासरच्या मंडळींचा समावेश होता. वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला आंदेकर टोळीने आयुष कोमकर (Ayush Komkar Murder) याला मारुन पूर्ण केला. या सगळ्या प्रकरणात पोलिसांचा (Pune Police) आंदेकर टोळीविषयीचा अंदाज चुकला आणि त्याची परिणती आयुष कोमकरच्या हत्येत झाली. पुणे पोलिसांनी आपला अंदाज चुकल्याची कबुलीही स्पष्टपणे दिली.

पुण्यातील आंदेकर कुटुंबाचा इतिहास हा रक्तरंजित राहिलेला आहे. आतापर्यंत टोळीयुद्धात आंदेकर कुटुंबातील सहा सदस्य मारले गेले आहेत. आंदेकर कुटुंबावर पूर्वीपासून पुण्यातील अनेक राजकारण्यांचा वरदहस्त राहिला आहे. 2024 साली बंडू आंदेकर याने सामोपचाराची भाषा करत टोळीयुद्धाला विराम देण्याचा मानस व्यक्त केला होता. इथून पुढे काही करणार नाही, वाद मिटवून घ्यावेत, असे त्याने म्हटले होते. मात्र, आंदेकर कुटुंबातील मालमत्तेचा वाद नंतरच्या काळात प्रचंड चिघळला. आपल्याला प्रॉपर्टीतील हिस्सा मिळावा, यासाठी बंडू आंदेकर यांच्या मुली आणि जावई आक्रमक झाले होते. वनराज आणि कृष्णराज  आंदेकर यांनी आपल्याला मालमत्तेतील वाटा द्यावा, अशी मागणी ते सातत्याने करत होते. मात्र, हा वाटा न दिल्यामुळे गेल्यावर्षी वनराज आंदेकर याची कोयत्याने वार करुन आणि गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यामध्ये वनराज आंदेकर याच्या बहिणी आणि त्यांचे नवरे सामील होते. यानंतर पोलिसांनी संपूर्ण कोमकर कुटुंब आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकले. कोमकर कुटुंबातील गणेश कोमकर, त्याचा भाऊ आणि त्याची बायको तुरुंगात गेल्यावर प्रॉपर्टीचा हा वाद आणि पर्यायाने टोळीयुद्ध आपोआप थांबेल, असा पोलिसांचा अंदाज होता. 

पोलिसांनाही आता आंदेकर टोळी मारण्यासाठी कोणीही बाहेर नसल्याने काही करणार नाही, असे वाटले होते. मात्र, गेली अनेक वर्षे गुन्हेगारीत मुरलेल्या बंडू आंदेकरने इथेच सगळ्यांचा अंदाज चुकवत कोणीही कल्पना केली नव्हती, अशी कृती केली. बंडू आंदेकरने आपल्याच 19 वर्षांच्या नातवाला ठार मारुन 'खून का बदला खून', असा संदेश दिला. हा वाद फक्त मालमत्तेचा नव्हता तर माझ्या मुलाला (वनराज आंदेकर) मारले आता पुढचा नंबर तुझ्या मुलाचा, असा न्याय बंडू आंदेकर याने लावला. आंदेकर गँगच्या शुटर्सनी 9 गोळ्या घालून आयुष कोमकरच्या शरीराची चाळण केल्यानंतर "इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर", असे ओरडत होते. यावरुन बंडू आंदेकरला पुण्यात फक्त आमचीच दहशत आणि वर्चस्व राहणार, असा संदेश द्यायचा होता. या वादाचा बळी ठरलेला आयुष कोमकर हा अवघ्या 19 वर्षांचा होता. त्याच्यावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नव्हती. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात नसलेल्या आपल्या नातवाला बंडू आंदेकर संपवेल, असे पोलिसांना वाटत नव्हते. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासगीत ही बाब मान्य केली.

आणखी वाचा

ए गोविंदा... झोपलाय तो, पप्पा आलेत, उठायला सांग त्याला; गणेश कोमकर लेकाचा मृतदेह पाहताच धाय मोकलून रडला

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
Pune Crime News: शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
Ramesh Mhatre: डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
Influencer Attacked: LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले
LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget