एक्स्प्लोर
Nashik Accident : राहुड घाटात टँकर उलटल्याने गॅस गळती, एकाचा मृत्यू, गळती रोखण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
Nashik Accident : मुंबई - आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात काल रात्री गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरू झाली आहे.
Nashik Accident
1/10

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवच्या राहूड घाटामध्ये भारत गॅसच्या बुलेट टँकरला ट्रकने कट मारल्याने गॅस टँकर उलटला आहे.
2/10

अपघातामुळे टँकरमधून गॅसची गळती सुरू झाली आहे.
3/10

मुंबई-आग्रा महामार्गावरून मालेगावकडे जाणारी सर्व वाहतूक मनमाडमार्गे वळवण्यात आली आहे.
4/10

तर मालेगावकडून येणारी वाहतूक चिंचवे उमराणे दरम्यान बंद करण्यात आली आहे.
5/10

दोन्ही बाजूची वाहतूक मनमाडमार्गे वळविण्यात आलेली आहे.
6/10

गॅस गळती थांबवण्यासाठी मनमाड, सिन्नर येथून पथक रवाना आले आहे.
7/10

घटनास्थळावर अग्निशमन दलाचे बंब सज्ज ठेवण्यात आले आहे.
8/10

सोमाटोल कंपनीचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे.
9/10

गॅस गळतीमुळे टँकरवर पाण्याचा मारा करण्यात येत असून सकाळपासून गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
10/10

तर गॅस टँकरमधल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. गॅस गळतीमुळे आजू बाजूच्या गावांना तसेच रस्त्यावरील ढाबा चालकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहे.
Published at : 09 Sep 2025 11:22 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























