एक्स्प्लोर
बीडचा लिटील जीनियस! दोन वर्षांच्या ध्रुवने केली कमाल, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झळकलं नाव, Photos
Beed News
1/7

"मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" ही म्हण बीडच्या ध्रुव चरखा याच्या बाबतीत अक्षरशः खरी ठरते आहे.
2/7

अवघ्या दोन वर्षांचा हा चिमुकला आपल्या बहुआयामी बुद्धिमत्तेने सध्या बीडकरांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.
3/7

ध्रुव केवळ दोन वर्षांचा असतानाही विविध देशांचे राष्ट्रध्वज ओळखतो, मराठी आणि इंग्रजी महिन्यांची नावे सांगतो, श्लोक, भजन म्हणतो, आकृतींची ओळख पटवतो आणि पियानोच्या सुरांतून धून वाजवतो.
4/7

ध्रुवला त्याच्या आईने वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाने घडवण्याचा निर्धार केला. मोबाईल, टीव्ही यांपासून दूर ठेवत, वैचारिक आणि बौद्धिक पोषण देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
5/7

ध्रुवचा जन्म ३० जुलै २०२३ रोजी बीड शहरातील ब्राह्मणवाडीतील चरखा कुटुंबात झाला.
6/7

ध्रुव युवराज चरखा सध्या बीडकरांसाठी कुतूहुलाचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.
7/7

ध्रुवच्या या यशामुळे बीड शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले असून, या चिमुकल्याचा प्रेरणादायी प्रवास अनेक पालकांसाठी मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.
Published at : 29 Jul 2025 01:35 PM (IST)
आणखी पाहा






















