छत्रपती संभाजीनगर हादरलं! पोलिस कर्मचाऱ्यासह सख्ख्या भावाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Crime News : पिडीत मुलगी गर्भवती राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. तर, या प्रकरणी दोन्ही नराधमांविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गंगापूर तालुक्यात सख्ख्या भावासह नात्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape) केला आहे. पिडीत मुलगी गर्भवती राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. तर, या प्रकरणी दोन्ही नराधमांविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष होनाजी गांगुर्डे असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर यातील आरोपी भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर गंगापूर शहरातील पीडितेच्या सख्ख्या भावाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत शेतात व राहत असलेल्या घरी वेळोवेळी अत्याचार केला. तसेच, ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेला पोहेकॉ सुभाष होनाजी गांगुर्डे याने देखील नात्यातील या अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घरी, घरात कोणी नसताना सहा महिन्यांपूर्वी बलात्कार केला. त्यामुळे, या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून तिचा सख्खा भाऊ तसेच नातेवाईक पोहेकॉ. सुभाष होनाजी गांगुर्डे विरोधात पॉक्सो व विविध कलमांतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेला धीर देऊन विचारपूस केल्यावर दुसऱ्याही आरोपीचे नाव आले समोर
पोलिसांनी सुरवातीला या प्रकरणात पिडीत तरुणीच्या भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणात आणखीन एक गुन्हेगार असून, तो पोलिस खात्यात असल्याने, पिडीत मुलीला त्याचे नाव सांगण्याची हिंमत झाली नाही. परंतु, पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पीडितेला धीर देत अधिक माहिती घेतली. यावेळी तिने नातेवाईक असलेल्या आरोपी पोलीस कर्मचारी गांगुर्डेनेही वेळोवेळी आपल्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा केला. त्यामुळे पोलिसांनी तिचा पुन्हा जबाब आरोपी गांगुर्डेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच भावाने पळ काढला...
पिडीत मुलगी गर्भवती राहिल्याने तिला धक्काच बसला आणि तिने पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या निर्णय घेतला. तर, आपल्या विरोधात गुन्हा दाखल होणार असल्याचे कळताच पीडितेच्या आरोपी भावाने शहरातून पळ काढला. मात्र, पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी गुन्हा दाखल होताचा आरोपीला शोधून त्याला बेड्या ठोकल्या आहे. सोबतच यातील दुसऱ्या आरोपीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला देखील पोलिसांकडून अटक केल्या जाण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: