Beed Accident : मित्राच्या लग्नाच्या निघालेल्या तरुणांवर काळाने घाला, बीडमधील कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, एक जखमी
Beed Accident : मित्राच्या लग्नाच्या निघालेल्या तरुणांवर काळाने घाला घातला आहे. बीडमध्ये (Beed) कारला झालेल्या भीषण अपघातात (Accident) तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला आहे.
Beed Accident : मित्राच्या लग्नाच्या निघालेल्या तरुणांवर काळाने घाला घातला आहे. बीडमध्ये (Beed) कारला झालेल्या भीषण अपघातात (Accident) तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान महामार्ग पेट्रोलिंग पथकाने अपघातग्रस्त कार बाजूला केली आणि काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत झाली.
चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार तीन वेळा उलटली
बीडहून मध्यरात्री पेडगावच्या दिशेने जात असलेल्या कारवरचं नियंत्रण सुटल्याने घोसापुरी शिवारात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Dhule-Solapur National Highway) औरंगाबादच्या दिशेने निघालेल्या मारुती सुझुकी सियाज कारला मध्यरात्री घोसापुरी शिवारात भीषण अपघात झाला. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने कार तीन वेळा उलटली. यात तीन जणांनी जागीच प्राण सोडले.
मित्राच्या लग्नाला जाताना काळाचा घाला
धीरज गुणदेजा (वय 30 वर्षे), रोहन वाल्हेकर (वय 32 वर्षे), विवेक कानगुने (वय 33 वर्षे) अशी मृतांची नावं आहे. तर आनंद वाघ (वय 28 वर्षे) असं जखमी तरुणाचं नाव आहे. हे सगळे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील रहिवासी असून बीडला त्यांच्या मित्राच्या लग्नाला जाताना हा विचित्र अपघात घडला. जखमी आनंद वाघला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. महामार्ग पेट्रोलिंग पथकाने अपघातातील कार बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत झाली.
बीडमध्ये मुक्ताईच्या पालखीत दुचाकी घुसल्याने अपघात
चार दिवसांपूर्वी बीडमध्ये मुक्ताईच्या पालखीत दुचारी घुसल्याने अपघात झाला होता. यात तीन वारकरी महिला जखमी झाल्या होत्या. बीडच्या उदंड वडगाव इथे 19 जून रोजी मुक्ताईची पालखी आल्यानंतर विश्रांतीसाठी वारकरी थांबले होते. इथे मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांना दुचाकीस्वाराने धडक दिली. त्यामुळे तीन महिला जखमी झालेल्या आहेत. त्यामुळे या वारकऱ्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
झाडाला धडकून कारचा चक्काचूर; दोन डॉक्टरांचा मृत्यू
तर या महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 9 जून रोजी अंबाजोगाई तालुक्यातील सनई ते आडस रस्त्यावर कार झाडाला धडकल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात अंबाजोगाई येथील फिजिओथेरेपिस्ट असलेल्या डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. प्रमोद बुरांडे आणि रवी सातपुते अशी मृत डॉक्टरांची नावं आहेत.
हेही वाचा