मोठी बातमी: कळंबमध्ये महिलेच्या मृतदेहासोबत दोन दिवस झोपला, तिसऱ्या दिवशी वास येऊ लागल्याने बाहेर पडला, आरोपीची थरारक कबुली
Santosh Deshmukh Beed Crime Case: कळंबमधील महिलेचा मृतदेह चार दिवसांपूर्वी सडलेल्या अवस्थेत सापडला होता.

Santosh Deshmukh Beed Crime Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी (Santosh Deshmuk Murder Case) संबंध असलेल्या कळंबमधील महिलेचा मृतदेह (kalamb women died) चार दिवसांपूर्वी सडलेल्या अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी आता बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले (Rameshwar Bhosale) आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. तसेच आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात भयावह माहिती देखील समोर आली आहे.
महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहा सोबतच त्याच खोलीत दोन दिवस झोपला, अशी थरारक माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मृतदेहा शेजारी बसूनच त्यांन जेवणही केलं. मात्र तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची बॉडी घेऊन बाहेर पडला. त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेने आपल्या केज येथील मित्राला घेऊन येत मृतदेहही दाखवला. रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा. काही आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवत मयत महिला आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिल्याचं कळत आहे. 22 मार्च रोजी हत्या घडली त्या दिवशी महिलेने आरोपीला उठाबशाही काढायला लावल्याचं सूत्रांनी सांगितलं.
कळंब येथील द्वारका नगरी वसाहतीत मृत महिलेची माहिती-
- मनीषा कारभारी बिडवे असं या मृत महिलेचे नाव
- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा हे महिलेचे जन्मगाव
-तर बीड जिल्ह्यातील आडस हे महिलेचे माहेर
- कळंब शहरातील द्वारकानगरी वसाहतीत ती एकटी राहत होती
- मृत महिला खासगी सावकारी देखील करत असल्याची माहिती
- अनैतिक संबंधातून महिलेची हत्या झाल्याचा संशय
- महिलेच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट, घरात मृतदेह आणि बाहेरून कुलूप लावलेलं
रुग्णवाहिकेचा पाठलाग अन् प्लॅन फसला-
सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी मस्साजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना बीड पोलिसांनी रचलेल्या कटाबद्दल सांगितले होते. संतोष देशमुख यांच्या मृतदेहाबाबत माहिती मिळाली तेव्हा गावकरी तिकडे गेले. पोलिसांना संतोष देशमुखांना कुठे नेण्यात आले आहे तिथपासून त्यांचा मृतदेह केजमध्ये आणून टाकेपर्यंत सगळे काही माहिती होते. गावकरी संतोष देशमुखांच्या मृतदेहापाशी पोहोचले तोपर्यंत पोलिसांनी तिकडे एक रुग्णवाहिका आली होती. या रुग्णवाहिकेतून संतोष देशमुखांचा मृतदेह केजकडे न नेता कळंबच्या दिशेने नेण्यात आला. तिकडे एका महिलेला तयार ठेवण्यात आले होते. या महिलेशी संतोष देशमुख यांचे अनैतिक संबंध होते, त्यांच्यातील वादातून संतोष देशमुखांची हत्या झाली, असे बीड पोलिसांना दाखवायचे होते. मात्र, मस्साजोग गावातील तरुण रुग्णवाहिकेचा पाठलाग करत असल्याने हा प्लॅन फसला, असे गावकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना सांगितले होते.























