(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed News: बदलीसाठी अपंगाचे बनावट प्रमाणपत्र, 'त्या' 23 शिक्षकांच्या प्रमाणपत्राचा अहवाल आज होणार सादर
Beed News: विशेष म्हणजे याच बनावट प्रमाणपत्राप्रकरणी यापूर्वी 52 शिक्षकांना निलंबित करण्यात आला आहे.
Beed News: जिल्हा अंतर्गत बदलीसाठी 23 शिक्षकांनी (Teacher) मेंदू विकाराने त्रस्त असल्याचे प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर केले होते. मात्र हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर याच प्रमाणपत्राची तपासणी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात करण्यात आली होती. दरम्यान आज याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याच बनावट प्रमाणपत्राप्रकरणी यापूर्वी 52 शिक्षकांना निलंबित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या सर्व शिक्षकांवर देखील कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा अंतर्गत बदलीसाठी सोयीचे ठिकाण मिळाव म्हणून, बीड जिल्ह्यातील 336 शिक्षकांनी दिव्यांग व गंभीर आजारी असल्याचे प्रमाणपत्र मिळवून त्याचा फायदा घेतला होता. त्यानंतर याच प्रमाणपत्राची तपासणी केली असता 52 शिक्षकांचं प्रमाणपत्र बनावट असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आल होते. त्यानंतर आता उर्वरित 26 शिक्षकांच्या प्रमाणपत्राची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात आली आहे. त्याचा अहवाला आज जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या शिक्षकांवर कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
बदलीसाठीची लढवलेली शक्कल गुरूजींच्या अंगलट
जिल्हा अंतर्गत बदलीसाठी सोयीचे ठिकाण मिळाव म्हणून शिक्षकांची नेहमीच धडपड असते. मात्र बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी सोयीचे ठिकाण मिळावे म्हणून वेगळीच शक्कल लढवली. या शिक्षकांनी दिव्यांग व गंभीर आजारी असल्याचे बनावट प्रमाणपत्र बनवून घेतले. मात्र तपासणी दरम्यान मूळ प्रमाणपत्र व पुनर्तपासणीच्या अहवालात या शिक्षकांच्या दिव्यांगत्व टक्केवारीत फरक आढळून आला. त्यामुळे या सर्व गुरुजींची मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्यासमोर त्यांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली होती. पुढे 52 शिक्षकांच्या प्रमाणपत्राची चौकशी केल्यानंतर यामध्ये दोषी ते दोषी आढळून आल्याने बीडचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आता आणखी 23 शिक्षकांच्या प्रमाणपत्र चौकशीचा अहवाल येणार आहे.
मोठं रॅकेट असण्याची शक्यता...
जिल्हा अंतर्गत बदलीसाठी सोयीचे ठिकाण मिळाव म्हणून शिक्षकांनी दिव्यांग व गंभीर आजारी असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार केल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एकट्या शिक्षण विभागात शंभरच्या घरात बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याने इतर वेगवेगळ्या खात्यात असे किती प्रमाणपत्र बनवले गेले असतील असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोबतच एवढ्या मोठ्याप्रमाणावर बनावट प्रमाणपत्र करणारे लोकं कोण आहेत? याचा देखील शोध घेण्याची गरज आहे. त्यामुळे आरोग्य विभागात मोठं रॅकेट असण्याची शक्यात वर्तवली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI