एक्स्प्लोर

पोटातलं ओठांवर आलं! अजित पवार अपघाताने सत्तेत, त्यांना आम्ही सरकार मानत नाही: मनोज जरांगे

Manoj Jarange : अजित पवार यांनी पहिल्यापासून हेच केलं, ते पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठले असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.

बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईला येतांना जर कोणी कायदा हातात घेणार असेल तर, त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हणणाऱ्या अजित पवारांच्या पोटातलं ओठांवर आले असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. बीडच्या (Beed) दौऱ्यावर असतांना पत्रकारांशी बोलतांना जरांगे यांनी हे वक्तव्य केले आहे. 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून, मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार आहेत. यावरच कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अजित पवार बोलताना असं म्हणाले की, मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "तुम्ही पहिल्यापासून हेच केलं. तुम्ही पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठले. तुम्ही मौन धरलं होतं, त्यामुळे तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचं आम्हाला वाटले होते. शेवटी अजित पवार यांनी पोटातलं ओठावर आणलंच. आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम असून, जर कारवाई केली तर मराठा समाज शांततेत अजित पवारांना उत्तर देईल. अजित पवार हे अपघाताने सरकारमध्ये आलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सरकार मानत नाहीत असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. 

मनोज जरांगे बीडच्या दौऱ्यावर...

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या उपोषणाची घोषणा केल्यानंतर त्यांचा सहाव्या टप्प्यातला दौरा सुरू झाला असून, आज या दौऱ्याचा चौथा दिवस आहे. जालना जिल्ह्यातील दौरा संपून मनोज जरांगे पाटील आता बीड जिल्ह्यात दाखल झाले आहे. या दरम्यान खामगावमध्ये त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आज आणि उद्या मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या  गावांमध्ये संपर्क दौरा करणार आहेत. या काळात ते मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासंदर्भात मराठा बांधवांशी गावागावात जाऊन चर्चा करणार आहेत. तर आज आणि उद्या मनोज जरांगे पाटील हे बीडच्या गेवराई तालुक्यातच मुक्कामी असणार आहेत. 

आता माघार नाही... 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे मुंबईच्या दिशीने निघणार आहेत. त्यापूर्वी जरांगे हे गोदाकाठच्या 123 गावांचा दौरा करत आहे. दरम्यान, आज बीड जिल्ह्यातील गावांचा त्यांच्याकडून दौरा केला जात आहे. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की,”आता माघार नाही. मराठा आरक्षण मिळणार आहेच, विरोधक वैगरे उलथापालथ झाले. त्यांचा विषय आता संपला आहे. मराठा समाज आता आरक्षणात गेला आहे. सरसकट आरक्षण घेतल्याशिवाय आपली आता माघार नाहीच, असेही जरांगे म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

'धनगर, वंजारी आरक्षणावर बोलणारे अर्धवटराव'; गोपीचंद पडळकरांची जरांगेंवर अप्रत्यक्ष टिका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉरAjit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget