एक्स्प्लोर

काय आहे ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम? याची सुरुवात कशी झाली...

ग्लोबल एनसीएपी ( Global New Car Assessment Program)  ही एक संस्था आहे, जी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या चाचण्या करून कारल रेटिंग देते.

भारतात रस्ते अपघातात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. अशातच एखादी कार खरेदी करताना आपण इंटरनेटचा वापर करून आपल्या हवी असलेल्या कारबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्या माहितीवर कितीपट विश्वास ठेवता येईल? हा एक प्रश्न आहे. इंटरेटवर उपलब्ध असलेली माहिती आणि कार विकत घेताना सेल्समन आपल्याला जी माहिती देतो. यात किती तथ्य आहे. हे जेव्हा आपण प्रत्यक्ष कार खरेदी करून वापरतो, त्यानंतरच आपल्याला कळतं. मात्र असं असलं तरी कार खरेदी केल्यानंतर कारच्या इतर फीचर्ससोबत तडजोड करता येते. पण कारच्या सुरक्षा संबधित फीचर्सशी कोणतीही तडजोड करणं महागात पडू शकत. यासाठीच झिरो 'Zero Accident' चे उद्दिष्ट ठेवून 'ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम'ने कार क्रॅश टेस्ट सुरू केली आहे. या प्रोग्राममध्ये कोणतीही कार ग्राहकांसाठी किती सुक्षित आहे, याची वेगेवेगळ्या पातळीवर चाचण्या करून रेटिंग दिली जाते.      

काय आहे 'ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम'? 

ग्लोबल एनसीएपी ( Global New Car Assessment Program)  ही एक संस्था आहे, जी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या चाचण्या करून कारल रेटिंग देते. या प्रोग्राम अंतर्गत कारची वस्तुनिष्ठ चाचणी करून संबधित कार किती सुरक्षित आहे, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा या संस्थेचा उद्देश आहे. ही संस्था चाचणी केलेल्या कारला 0-5 स्टार  रेटिंग देते. कार कंपन्यांसाठी ग्लोबल NCAP रेटिंग खूप महत्वाची आहे. कारण रेटिंग मिळाल्याने कारचे चांगले मार्केटिंग होते. गेल्या काही वर्षांत ग्लोबल NCAP ने अनेक देशी आणि विदेशी कार कंपन्यांच्या शेकडो कारची चाचणी केली आहे. 1978 मध्ये ग्लोबल एनसीएपीने अमेरिकेत पहिल्यांदा कारची क्रॅश टेस्ट केली होती. त्यानंतर इतर अनेक देशांनीही आपल्याकडे उत्पादित कराची गुणवत्ता तपासण्यासाठी खाजगी स्तरावर NCAP प्रोग्राम सुरू केला. 

आज अमेरिका एनसीएपी, युरो एनसीएपी, ऑस्ट्रेलिया एनसीएपी, जपान एनसीएपी, आशियाई एनसीएपी, चीनी एनसीएपी, लॅटिन एनसीएपी आणि ग्लोबल एनसीएपी कारसाठी चाचणी रेटिंग देतात. प्रत्येक एनसीएपीमध्ये कारसाठी वेगवेगळे चाचणी प्रोटोकॉल आणि रेटिंग असतात. युरो एनसीएपीमध्ये कारच्या पुढील साईड आणि साईड पोलची चाचणी केली जाते, तर ग्लोबल एनसीएपीमध्ये, कारच्या ऑफसेटची क्रॅश चाचणी केली जाते.

कशी केली जाते क्रॅश टेस्टसाठी कारची निवड? 

कोणतीही कार उत्पादक कंपनी आपली नवीन कार बाजारात लॉन्च करण्यापूर्वी 'ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम'ला कारची क्रॅश टेस्टिंग करण्याची विनंती करते. यानंतरच कारचे क्रॅश टेस्ट केले जाते. हे क्रॅश टेस्ट करण्यासाठी संबंधित कार कंपनी कारसोबतच संपूर्ण खर्च ही ग्लोबल एनसीएपीला देते. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट करण्यासाठी कार कंपनी पुरवत असलेली कार घेत नसून ही कार देशभरातील कोणत्याही कंपनीच्या डिलरशिपकडून ग्लोबल एनसीएपी घेते. ग्लोबल एनसीएपी कोणत्या डिलरशिपकडून कार घेणार आहे, याची माहिती संबधित कार कंपनीला देण्यात येत नाही. जेणेकरून कारची वस्तुनिष्ठ क्रॅश टेस्ट केली जाऊ शकेल.

कशी केली जाते क्रॅश टेस्ट? वाचा 

Car Crash Test : कशी केली जाते कार 'क्रॅश टेस्ट'? सेफ्टी रेटिंग म्हणजे काय? वाचा सविस्तर माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Embed widget