Upcoming Honda SUV: Hyundai Creta ला टक्कर देणार Honda ची नवीन SUV, जुलैपर्यंत बाजारात घेणार एंट्री
New Honda SUV: Honda Cars India ने अलीकडेच नवीन RDE मानदंडांशी सुसंगत इंजिनांसह त्यांची नवीन सिटी सेडान सादर केली आहे. आता कंपनी या वर्षी जुलै-सप्टेंबर दरम्यान आपली नवीन SUV आणण्याची तयारी करत आहे.
New Honda SUV: Honda Cars India ने अलीकडेच नवीन RDE मानदंडांशी सुसंगत इंजिनांसह त्यांची नवीन सिटी सेडान सादर केली आहे. आता कंपनी या वर्षी जुलै-सप्टेंबर दरम्यान आपली नवीन SUV आणण्याची तयारी करत आहे. होंडाची ही नवीन एसयूव्ही मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडर आणि किया सेल्टोसशी स्पर्धा करेल. चला तर या अपकमिंग SUV बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ..
New Honda SUV: ADAS ने असेल सुसज्ज
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशी माहिती मिळाली आहे की होंडाची नवीन SUV रडार-आधारित अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्ट सिस्टम म्हणजेच ADAS ने सुसज्ज असेल. ज्यामध्ये स्वयंचलित टक्कर ब्रेकिंग सिस्टम, लेन कीपिंग असिस्ट सिस्टम, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट सिस्टम, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ऑटो हाय-बीम यासारखे अॅडव्हान्स फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. या मॉडेलमध्ये 6 एअरबॅग्ज, कार स्टेबलिटी कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार टेक, होंडाची लेन वॉच सिस्टम, हिल होल्ड असिस्ट, EBD सह ABS आणि सेफ्टी फीचर्स म्हणून इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यांसारखी फीचर्स देखील मिळतील.
New Honda SUV: हायब्रीड पॉवरट्रेन मिळेल
नवीन Honda SUV बद्दल कंपनीकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार 1.5L iVTEC पेट्रोल आणि 1.5L Atkinson सायकल इंजिनसह येईल, जी e:HEV हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असू शकते. त्याचे गॅसोलीन युनिट 121 bhp ची कमाल पॉवर आणि 145Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह लॉन्च केले जाऊ शकते. याचा हायब्रिड सेटअप 253Nm टॉर्कसह 109 bhp पॉवर जनरेट करू शकतो.
New Honda SUV: डिझाइन ग्लोबल होंडा एसयूव्ही द्वारे प्रेरित असेल
नवीन Honda SUV चे डिझाइन आणि स्टाइलिंग कंपनीच्या ग्लोबल-स्पेक मॉडेल WR-V वरून प्रेरित असेल. यात एलईडी डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प आणि एक लांब बोनेट मिळेल. SUV ला स्लिम रूफलाइन, इलेक्ट्रिक सनरूफ, एक टेलगेट माउंटेड स्पॉयलर आणि LED एलिमेंट्स सोबत रॅपराऊंड टेललॅम्पसह एक उपराईट स्टॅन्स मिळेल.
Hyundai Creta शी स्पर्धा करेल
ही कार भारतीय बाजारपेठेत Hyundai Creta शी स्पर्धा करते, या कारमध्ये डिझेल आणि पेट्रोल दोन्ही इंजिनचा पर्याय आहे. नुकतेच कंपनीने याचे इंजिन देखील अपडेट केले आहे.