एक्स्प्लोर

TVS Company History:  बस कंपनी ते देशातील आघाडीची दुचाकी कंपनी; 'टीव्हीएस'ची मुहूर्तमेढ रोवणारे अय्यंगार

TVS Company History:  टीव्हीएस कंपनीचे संस्थापक टी. व्ही. सुंदरम अय्यंगार यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रवासावर टाकलेला दृष्टीक्षेप...

TVS Company History:  परदेशातील काही नावाजलेल्या कंपन्यांचा प्रवास चांगलाच प्रेरणादायी असतो. या कंपन्यांचा इतिहास वाचताना, नव उद्योजकांना प्रेरणा मिळत असते. भारतातही काही उद्योगांच्या उभारणीचा प्रवास प्रेरणादायी असा आहे. भारतात मोटारसायकलच्या बाजारपेठेत आघाडीची कंपनी असलेल्या टीव्हीएस कंपनीचा (TVS) प्रवासही प्रेरणादायी आहे. एक साध्या बस कंपनीतून टीव्हीएसने आपले साम्राज्य उभारले आहे. टी. व्ही. सुंदरम अय्यंगार (T V Sundram Iyengar) यांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. 

टीव्हीएस कंपनीचे संस्थापक टीव्ही सुंदरम अय्यंगार यांनी सुरुवातीला नोकरी केली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी भारतीय रेल्वे नोकरी केली. त्यानंतर काही काळ बँकेतही नोकरी केली. नोकरीत फारस मन रमत नसल्याचे अय्यांगार यांनी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. अय्यंगार यांनी दक्षिण भारतात पहिल्यांदाच परिवहन सेवा सुरू केली. 1911 मध्ये मद्रास प्रातांतील मदुराई मध्ये पहिल्यांदा बससेवा सुरू केली होती. टी.व्ही. सुंदरम अय्यांगार अॅण्ड सन्स लिमिटेड (T V Sundram Iyengar & Sons Private Limited) या कंपनीच्या माध्यमातून परिवहन सेवेत ते उतरले.  Southern Roadways Limited च्या नावाखाली बस आणि मालवाहतूक सेवा त्यांच्या कंपनीच्यावतीने चालवली जात असे.  

असं म्हणतात की, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मद्रास प्रांतात पेट्रोलची टंचाई निर्माण झाली होती. इंधनाची मागणी पूर्ण करण्यासाठी सुंदरम अय्यंगार यांनी TVS गॅस प्लांटची रचना आणि निर्मिती केली. मद्रास ऑटो सर्व्हिस लिमिटेड आणि सुंदरम मोटर्स या दोन कंपन्या टी. व्ही. सुंदरम अय्यंगार अँड सन्स लिमिटेडच्या अखत्यारीत त्यांनी सुरू केल्या. त्याशिवाय, त्यांनी रबर रिट्रेडिंगचा कारखानाही सुरू केला. 1950 च्या दशकात जनरल मोटर्सचा सर्वात मोठा वितरक होता. अय्यंगार यांनी आवड म्हणून सुरू केलेल्या व्यवसायाने चांगली प्रगती केली आणि कुटुंबातील इतरांनी या व्यवसायाची जबाबदारी उचलली. टी. व्ही. सुंदरम अय्यांगार यांचे 28 एप्रिल 1955 रोजी मद्रास प्रांतात निधन झाले. टी.व्ही. सुंदरम अय्यांगार यांनी सुरू केलेल्या व्यवसायाला त्यांच्या वारसांनी आणखी व्यापक स्वरुप दिलं. 

सुंदरम क्लेटनची स्थापना 1962 मध्ये क्लेटन देवेंद्र होल्डिंग्ज, युनायटेड किंगडम यांच्या सहकार्याने झाली. त्यातून ब्रेक, एक्झॉस्ट, कंप्रेसर आणि इतर अनेक ऑटोमोटिव्ह पार्ट्स तयार केले. कंपनीने त्याच्या नवीन विभागाचा भाग म्हणून मोपेड्स तयार करण्यासाठी 1976 मध्ये होसूर येथे एक प्लांट स्थापन केला. 1980 मध्ये, TVS 50, भारतातील पहिले दोन-सीटर मोपेड तामिळनाडूमधील होसूरमधील कारखान्यात तयार झाले. जपानी दिग्गज कंपनी सुझुकी लिमिटेड सोबतच्या तांत्रिक सहकार्यामुळे 1987 मध्ये सुंदरम क्लेटन लिमिटेड आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशन यांनी संयुक्तपणे उद्योग सुरू केला. त्यानंतर व्यावसायिकपणे मोटारसायकलचे उत्पादन 1989 मध्ये सुरू करण्यात आले होते. आ आ  

काळाची पावले उचलून अय्यंगार यांनी व्यवसाय सुरू केले आणि त्याचा विस्तार केला. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी, कुटुंबीयांना टीव्हीएसचा विस्तार केला. सध्या, टीव्हीएस कंपनी ही ऑटोमोबाइल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीची 8.5 अब्ज डॉलरची उलाढाल असून 60 हजारांहून अधिक कामगार कार्यरत आहेत. ऑटोमोटीव्ह, मोटरसायकल निर्मिती, वितरण, फायनान्स, इलेक्ट्रॉनिक्स आदी क्षेत्रात टीव्हीएसने आपली छाप सोडली आहे. टीव्हीएस कंपनी आता आयटी क्षेत्रात ही कार्यरत आहे.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget