(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Toyota Innova Hycross: Toyota Innova नवीन अवतारात परतणार, मिळणार जबरदस्त फीचर्स
Toyota Innova Hycross: प्रसिद्ध वाहनात उत्पादक कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटारची सर्वाधिक विक्री होणारी कार टोयोटा इनोव्हा, ज्याने भारतीय रस्त्यांवर 7-सीटर MPV सेगमेंटमध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे, ती लवकरच एका नवीन अवतारात दिसणार आहे.
Toyota Innova Hycross: प्रसिद्ध वाहनात उत्पादक कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटारची सर्वाधिक विक्री होणारी कार टोयोटा इनोव्हा, ज्याने भारतीय रस्त्यांवर 7-सीटर MPV सेगमेंटमध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे, ती लवकरच एका नवीन अवतारात दिसणार आहे. ही नवीन कार पूर्वीपेक्षा खूप वेगळे असेल. याचे लॉन्चिंग येत्या काही महिन्यांत होऊ शकते. नुकतीच ही कार भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. ही नवी कार भारतीय बाजारात इनोव्हा क्रिस्टाची जागा घेईल.
मिळेल नवीन हायब्रीड पॉवरट्रेन
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड पॉवरट्रेनने सुसज्ज असू शकते. नुकत्याच लॉन्च झालेल्या टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये देखील ही प्रणाली देण्यात आली आहे. या कारप्रमाणेच इनोव्हा हायक्रॉसला देखील उत्तम मायलेज मिळेल. ही कार पुढील महिन्यात जागतिक बाजारपेठेत उतरवली जाऊ शकते.
टेस्टिंग दरम्यान दिसलेल्या मॉडेलमध्ये इनोव्हा हायक्रॉस पूर्णपणे झाकलेली होती. त्यामुळे याबाबत फारशी माहिती मिळू शकली नाही. मात्र याचा आकार MPV सारखा आहे आणि त्याला ऑल-न्यू डिझाइन मिळण्याची शक्यता आहे. याच्या तिसर्या रांगेतील खिडकीचा आकार नियमित दिसत होता. तसेच हेडलॅम्प आणि टेललॅम्पलाही नवीन कोनीय आकार देण्यात आला आहे.
पॉवरट्रेन कशी असेल?
इनोव्हा हायक्रॉसमध्ये (Innova Hycross) दोन प्रकारचे इंजिन पर्याय मिळू शकतात. पण यापैकी कशातही डिझेल इंजिन नसेल. ही दोन्ही इंजिने हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली पेट्रोल युनिट असतील. यापैकी एक माईल्ड-हायब्रिड इंजिन असेल आणि दुसरे स्ट्रॉंग-हायब्रिड इंजिन असेल. ऑल-इलेक्ट्रिक मोड मजबूत हायब्रिड इंजिनमध्ये आढळू शकतो. या कारमध्ये HyRyder असलेली पॉवरट्रेन प्रणाली वापरली जाऊ शकते.
दरम्यन, ही कार लॉन्च झाल्यानंतर याची स्पर्धा भारतात Maruti Grand Vitara शी होईल. ही कारही कंपनीने माईल्ड-हायब्रीड आणि स्ट्रॉंग हायब्रीड प्रकारात लॉन्च केली आहे. भारतीय बाजारपेठेत याची किंमत 10.45 लाख ते 19.65 लाख रुपये इतकी (Maruti grand Vitara 2022 Price) आहे.
कधी होणार लॉन्च?
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Innova Hycross) पुढील महिन्यात नोव्हेंबर 2022 मध्ये जागतिक स्तरावर सादर केली जाऊ शकते. या कारची डिलिव्हरी पुढील वर्षी सुरू होण्याची अपेक्षा आहे. पुढील वर्षी याची किमतीही जाहीर केली जाऊ शकते.
इतर महत्वाच्या बातम्या: