Toyota Fortuner: टोयोटा फॉर्च्युनरची नवीन आवृत्ती लॉन्च, कंपनीच्या दोन कार महागल्या
Toyota Fortuner New Commander Edition Launch: टोयोटाच्या फॉर्च्युनरला आशियातील ऑटो मार्केटमध्ये मोठी पसंती मिळत आहे.
Toyota Fortuner New Commander Edition Launch: टोयोटानं आपल्या शक्तिशाली एसयूव्ही फॉर्च्युनरची नवीन आवृत्ती लॉन्च केलीय. त्याचबरोबर कंपनीनं आपल्या दोन कारच्या किमतीत वाढ केलीय. प्रसिध्द ऑटोमेकर टोयोटानं 2022 फॉर्च्युनरची स्पेशल एडिशन कमांडर ही गाडी लॉन्च केलीय. या स्पेशल कमांडर एडिशनमध्ये तुम्हाला अनेक नवीन फिचर्स पाहायला मिळतील. कंपनीनं नवीन 2022 फॉर्च्युनरला नवा लूक देण्याचा प्रयत्न केलाय. कंपनीनं 2022 फॉर्च्युनरचे इंटरिअर डिझाईनमध्येही बदल केला. परंतु, या कारच्या परफॉर्मेंसमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. कंपनीनं या आवृत्तीच्या मर्यादीत गाड्या बाजारात आणल्या आहेत.
जागतिक बाजारपेठेव्यतिरिक्त, टोयोटाच्या फॉर्च्युनरला आशियातील ऑटो मार्केटमध्ये मोठी पसंती मिळत आहे. टोयोटाची फॉर्च्युनर ही शक्तिशाली एसयूव्ही कार आहे. गेल्या वर्षी जपानी कार निर्माता कंपनीने फॉर्च्युनरची फेसलिफ्ट (Facelift) आवृत्ती आणली होती. ही कार 2022 फॉर्च्युनर कमांडर भारतात लॉन्च केली जाईल की नाही? याबद्दल टोयोटाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
नवीन अपडेट्स
कंपनीने टोयोटा फॉर्च्युनरच्या स्पेशल एडिशन कमांडरचे सस्पेंशन (Car Suspension) पूर्वीपेक्षा अधिक सुधारलंय. ही शक्तिशाली एसयूव्ही काळ्या रंगाच्या फ्रंट स्किड प्लेट्ससह येते. किंवा सिल्व्हर कलर आणि क्रोम गार्निशसह नवीन 2022 फॉर्च्युनरचा कलर पाहायला मिळेल. 2022 फॉर्च्युनरमध्ये अलॉय व्हील्स (Alloy Wheels) वापरलेले नाहीत. कंपनीने फॉर्च्युनरच्या कमांडर एडिशनमध्ये बॅक पॅनलवर कनेक्टिंग क्रोम स्ट्रिपचा (Chrome Strip) वापर केला आहे. हे एलईडी टेल लाईटसह येईल.
ग्लान्झा आणि अर्बन क्रूझर महागली
टोयोटानं भारतात ग्लान्झा आणि अर्बन क्रूझरच्या किंमती वाढवल्या आहेत. (Toyota Glanza G Smart Hybrid) वगळता, (Toyota Glanza) चे सर्व प्रकार 21,000 रुपयांनी महाग झाले आहेत. ( Hybrid) प्रकार आता 45 हजारांनी महाग होईल. अर्बन क्रूझरची किंमत 4 हजार 400 रुपयांवरून 17 हजार 500 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. किंमती वाढल्यानंतर, टोयोटा ग्लान्झाची किंमत 7.70 लाख ते 9.66 लाख इतकी झालीय. अर्बन क्रूझरची किंमत सुमारे 8.88 लाख रुपयांवरून 11.58 लाख रुपयांवर गेली आहे.
हे देखील वाचा-
- Hyundai Kia Car Fire Risk : Hyundai Kia चा ग्राहकांना शॉक! 5 लाख कारना आग लागण्याचा धोका
- कार प्रेमींसाठी खुशखबर! नवीन Baleno ची बुकिंग सुरु, जाणून घ्या याचे भन्नाट फीचर्स
- Mahindra Thar Per Day EMI : Mahindra Thar विकत घ्या फक्त 691 रुपयांत! SUV चा मालक व्हायची संधी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha