(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hyundai Kia Car Fire Risk : Hyundai Kia चा ग्राहकांना शॉक! 5 लाख कारना आग लागण्याचा धोका
Hyundai आणि Kia या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना मोठा शॉक दिला आहे. कारण या कंपनीने ग्राहकांना ईमेल पाठवला आहे. ज्यामध्ये ग्राहकांकडे असलेल्या जवळपास 5 लाख वाहनांना धोका असल्याचे म्हटले आहे.
Hyundai Kia Notice : Hyundai आणि Kia या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना मोठा शॉक दिला आहे. कारण या कंपनीने युएस ग्राहकांना ईमेल पाठवला आहे. ज्यामध्ये ग्राहकांकडे असलेल्या जवळपास 5 लाख वाहनांना धोका असल्याचे म्हटले आहे.
Hyundai Kia चा ग्राहकांना इशारा, यूएस 5 लाख मोटारींना आग लागण्याचा धोका
मेलमध्ये असं म्हटलंय, Hyundai आणि Kia कारच्या इंजिनमध्ये समस्या आहे. ज्यामुळे त्या गाड्यांना कधीही आग लागू शकते. या कार कंपन्याकडून विशिष्ट कार निवासी क्षेत्रे आणि इतर कारच्या अगदी जवळ पार्क न करण्याचा सल्ला दिला जातो. विद्युत समस्येमुळे अँटी-लॉक ब्रेक सिस्टमला आग लागण्याची शक्यता असते. कार कंपन्यांनी कार मालकांना ईमेल पाठवून सुरक्षिततेचे उपाय सांगितले आहेत आणि दुरुस्ती मोफत केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
कार मालकांनी वाहने घरापासून दूर पार्क करावीत.
Hyundai मोटार कंपनी आणि त्याची संलग्न कंपनी Kia ने आपल्या ग्राहकांना चेतावणी दिली आहे. ज्यात त्यांनी म्हटलंय, हायड्रोलिक इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (HECU)मॉड्यूलमध्ये बिघाड असल्याने कारच्या इंजिनमध्ये इलेक्ट्रिकल शॉर्ट होऊ शकतो, ज्यामुळे इंजिनला आग लागू शकते. आगीचा धोका दूर करण्यासाठी कारमध्ये डीलर सर्किट बोर्डसाठी नवीन फ्यूज लावण्यात येतील. कंपनीने परत मागवलेल्या कारमध्ये 2014-2016 चे मॉडेल Kia Sportage, 2016-2018चे मॉडेल Kia K900 आणि 2016-2018 चे मॉडेल Hyundai Santa Fe या वाहनांचा समावेश आहे. वाहने बंद असली तरीही कार मालकांनी वाहने घराबाहेर आणि इतर वाहने कारपासून दूर पार्क करावीत. नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) ने कारमालकांना ऑटोमेकर्सच्या सल्ल्याचे पालन करण्याचे आवाहन केले, उत्पादकांचा असे वाटत आहे की, अँटी-लॉक ब्रेक सिस्टममधील इलेक्ट्रिकल मशिनमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे वाहन चालू असताना आग लागण्याचा धोका वाढू शकतो.
संबंधित बातम्या :
- ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर...; उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात संजय राऊतांचा ईडीवर खळबळजनक आरोप
- Covid19 : सावधान! सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळले कोरोनाचे चार 'गुप्त' प्रकार, धोका वाढण्याची शक्यता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha