एक्स्प्लोर

कार प्रेमींसाठी खुशखबर! नवीन Baleno ची बुकिंग सुरु, जाणून घ्या याचे भन्नाट फीचर्स

2022 New Baleno Booking Started : मारुती सुझुकीने नवीन अपडेटेड 2022 बलेनोचे बुकिंग सुरू केले आहे. अगदी कमी पैशात तुम्ही घरी बसून ही कार प्री-बुक करू शकता.

2022 New Baleno Booking : सर्वाधिक मागणी असणाऱ्या बलेनो 2022 कारसाठी (2022 New Baleno) प्री बुकिंग सुरू झाली आहे.  प्रसिद्ध कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने सांगितले की, 2022 Baleno साठी तुम्ही Nexa आऊटलेट आणि कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन बुकिंग करू शकता. या कारची बुकिंग फक्त 11 हजार रुपयांमध्ये करता येणार आहे. 2022 बलेनो आकर्षक डिझाईनसह बाजारात उपलब्ध आहे. या कारमध्ये तुम्हाला अनेक अपडेटेड फीचर्स पाहायला मिळतील. या कारच्या किंमतीबाबत कंपनीने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. ही कार या महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. लॉन्च केल्यावर, ते Hyundai i20, Tata Altroz, Toyota Glanza आणि Honda Jazz सारख्या कारशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे.

जाणून घ्या या कारचे फीचर्स :
मारुती सुझुकीचा दावा आहे की 2022 बलेनोमध्ये हेड-अप डिस्प्ले आहे. या कारमध्ये तुम्हाला स्पीडोमीटर, क्लायमेट कंट्रोल यांसारखी महत्त्वाची माहिती मिळेल. यामुळे, ड्रायव्हरला रस्त्यावरून नजर हटवण्याची गरज नाही. तसेच तो वाहन चालवताना अधिक सोयीस्कर होईल. यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतील. नवीन 2022 मारुती सुझुकी बलेनो कारमध्ये पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये दिसतील. पहिल्या मॉडेलच्या तुलनेत कंपनीने ते खूप अपडेट केले आहे.

इंजिन :
नवीन बलेनोच्या इंजिनमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले नाहीत. हे इंजिनही जुन्या मॉडेलप्रमाणेच असेल. नवीन बलेनो के-सिरीज ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिनसह आयडल स्टार्ट-स्टॉप फंक्शनसह येईल. तथापि, कंपनीने नवीन बलेनो 2022 ची पॉवर आणि टॉर्क खुलासा केलेला नाही. नवीन बलेनो आऊटगोईंग मॉडेलप्रमाणेच पॉवर आणि टॉर्क जनरेट करेल अशी अपेक्षा आहे.

अपडेटेड डिझाईन :
नवीन बलेनोचे डिझाईन आणि केबिन अपडेट करण्यात आले आहे. या कारचे अलॉय व्हील डिझाइनही अपडेट करण्यात आले आहे. नवीन बलेनो सुधारित फ्रंट फेससह येईल. यात अपडेटेड फ्रंट ग्रिल, शार्प एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि इंटिग्रेटेड एलईडी डेटाइम रनिंग लाईट्स, अपडेटेड बंपर मिळतील. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget