Toyota Car : टोयोटाने ग्राहकांना दिला धक्का ! 'या' गाड्या झाल्या महाग, जाणून घ्या कारण
Toyota Car : जपानी ऑटोमेकर कंपनी टोयोटाने अर्बन क्रूझर आणि ग्लान्झा या दोन मॉडेलच्या किंमती वाढवल्या आहेत.
Toyota Car : जपानी ऑटोमेकर कंपनी टोयोटाने अर्बन क्रूझर आणि ग्लान्झा या दोन मॉडेलच्या किंमती वाढवल्या आहेत. दोन्ही वाहनांच्या वाढलेल्या किंमती 1 मे पासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत. मात्र, या वाहनांच्या किंमतीत किती वाढ करण्यात आली, याची माहिती कंपनीने दिलेली नाही. टोयोटा अर्बन क्रूझर आणि ग्लान्झा टोयोटा आणि सुझुकी ब्रँड्समधील भागीदारी म्हणून जागतिक स्तरावर विकल्या जातात. अर्बन क्रूझर आणि ग्लान्झा या मारुती सुझुकी विटारा ब्रेझा कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि प्रीमियम हॅचबॅक बलेनोच्या रिबॅज केलेल्या आवृत्त्या आहेत.
वाहनांच्या किंमती वाढविण्यामागे कंपनीने दिलेले कारण
टोयोटाने वाहनांच्या किंमती वाढविण्याबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीमुळे अंशत: भरून काढण्यासाठी ही वाढ आवश्यक असल्याचे म्हटले आहे. "आमच्या मौल्यवान ग्राहकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन एकूण किंमतीत वाढ करण्यात आली आहे," असे कार निर्मात्या कंपनीने सांगितले आहे.
इतर कंपन्यांनीही किंमतीत केली वाढ
टोयोटा ही भारतातील एकमेव कंपनी नाही, जिने आपल्या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. तर, इतर अनेक वाहन निर्मात्यांनीही कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यामुळे किंमती वाढवल्या आहेत. महिंद्रा, मारुती सुझुकी, टोयोटा, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ सारख्या अनेक कंपन्यांनी त्यांच्या मॉडेल लाइनअपमध्ये अनुक्रमिक पद्धतीने किंमती वाढवल्या आहेत.
अलीकडेच टाटा मोटर्सनेही आपल्या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. Tata Motors ने त्यांच्या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. जी 23 एप्रिल 2022 पासून लागू झाली आहे. ही वाढ मॉडेलनुसार स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने कारच्या किंमती वाढवाव्या लागल्याचे कंपनीने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :