Tata Nexon Facelift 2023 इलेक्ट्रिक आणि पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 'हे' तीन बदल असण्याची शक्यता
New Tata Nexon Facelift : नवीन Nexon Facelift मध्ये देखील कर्व्ह प्रमाणेच टू-स्पोक स्टीयरिंग व्हील पाहायला मिळेल.
New Tata Nexon Facelift : दिग्गज कार निर्मात्या कंपन्यांपैकीच एक नाव म्हणजेच टाटा मोटर्स कार (Tata Motors Car). टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी नवीन नेक्सॉन फेसलिफ्ट लवकरच लॉन्च करणार आहे. कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी नेक्सॉन ही कार आता नवीन अपडेट्ससह सब 4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्हीसह SUV लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. नवीन नेक्सॉन ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार असे कंपनीकडून सांगितले आहे. पण त्याआधी या कारमध्ये कोणते नवीन बदल केले आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे.
डीसीटी गिअरबॉक्ससह नवीन इंजिन
नवीन नेक्सॉन फेसलिफ्टला नवीन टर्बो पेट्रोल पॉवरट्रेन मिळेल, जी मागील ऑटो एक्सपोमध्ये कर्व्ह पेट्रोल कॉन्सेप्ट कारसह सादर करण्यात आली होती. नवीन 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन तीन सिलेंडर युनिट आहे, जे 125 bhp पॉवर जनरेट करते. ही सध्याच्या नेक्सॉन टर्बो पेट्रोलपेक्षा अधिक पॉवरफुल आहे. यात पॅडल शिफ्टर्ससह AMT च्या जागी DCT गिअरबॉक्स देखील मिळेल.
New Tata Nexon चा नवीन लूक
New Tata Nexon Facelift या कारचे मूळ डिझाईनचा लूक बदलेल याची शक्यता फार कमी आहे. नवीन नेक्सॉनमध्ये स्लिम एलईडी हेडलॅम्प आणि नवीन लोखंडी जाळीसह कर्व्ह कन्सेप्टसारखी अधिक आकर्षक रचना दिसू शकते. यात नवीन टेल-लॅम्प आणि नवीन अलॉय देखील मिळतील. नवीन Nexon EV व्हेरियंट देखील स्टाईलमध्ये वेगळे असेल. हे कार जेव्हा लॉन्च होईल तेव्हा लूक समजेल.
नवीन इंटीरियर आणि वैशिष्ट्ये
नवीन Nexon Facelift मध्ये देखील कर्व्ह प्रमाणेच टू-स्पोक स्टीयरिंग व्हील पाहायला मिळेल. तसेच, नवीन हॅरियर आणि नेक्सॉन प्रमाणे, नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि नवीन इन्फोटेनमेंट युनिटसह 10.25-इंच टचस्क्रीन असू शकते. याशिवाय 360 डिग्री कॅमेरा सारख्या सेफ्टी फीचर्सबरोबर आणखी फीचर्स पाहायला मिळतील. नवीन नेक्सॉन हे कंपनीसाठी महत्त्वाचे प्रोडक्ट आहे. आतील बाजूस, Tata Nexon फेसलिफ्टवर एक सर्व-नवीन स्टीयरिंग व्हील असेल, ज्यामध्ये बॅक-लाइट टाटा मोटर्स लोगो असू शकतो.
New Tata Nexon कारची स्पर्धा कोणाबरोबर असेल?
New Tata Nexon Facelife लॉन्च झाल्यानंतर ही कार टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट किआ सोनेट, ह्युंदाई वेर्ना, मारुती सुझुकी ब्रेझा आणि निसान मॅग्नाईट यांसारख्या कारशी स्पर्धा करणार अशी शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Honda Elevate Car : लवकरच भारतात लॉन्च होणार Honda Elevate कार; 'या' कारला देणार जबरदस्त टक्कर