(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मारुती आणि ह्युंदाईच्या 'या' जुन्या गाड्या मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत लोक, जाणून घ्या काय आहे कारण
Used Cars: एका अभ्यासानुसार, भारतात जुन्या गाड्यांच्या मागणीत आणि खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Used Cars: एका अभ्यासानुसार, भारतात जुन्या गाड्यांच्या मागणीत आणि खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पर्सनल मोबिलिटीची वाढती गरज, नवीन कारसाठी करावी लागणारी प्रतीक्षा, यामुळे जुन्या कारचे बाजार वाढताना दिसत आहे आणि हे पुढे ही असेच वाढत राहणार. सध्या सर्वाधिक जुन्या कारच्या मागणीमध्ये मारुती डिझायर, एर्टिगा प्लस आणि ह्युंदाई क्रेटा यांचा समावेश आहे.
जुन्या कारच्या बाजारात मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि ह्युंदाई (Hyundai) आघाडीवर आहे. यामध्येच बाजारात मारुतीच्या WagonR, Ertiga आणि DZire ची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर एसयूव्हीमध्ये सर्वाधिक विकल्या जाणार्या क्रेटाला देखील जुन्या कारमध्ये सर्वाधिक मागणी आहे. या बाजारात क्रेटाच्या डिझेल आणि पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंटला विशेष मागणी आहे. क्रेटाचा जुना मॉडेल सर्वाधिक डिमांडिंग एसयूव्हीमध्ये गणला जात आहे. त्यानंतर टाटा नेक्सन आणि मारुती ब्रेझा यांचा क्रमांक लागतो. कारण पूर्वीच्या ब्रेझामध्ये डिझेल इंजिन होते.
सेडान कारमध्ये होंडा सिटी हा एक अतिशय लोकप्रिय पर्याय आहे. चिप्स नसल्यामुळे नवीन गाड्यांचा वेटिंग पिरिअड आणखी वाढला आहे. इतर लोकप्रिय असलेल्या जुन्या गाड्यांमध्ये टोयोटा इनोव्हा यांचा समावेश आहे. जी फोर्च्युनर आणि फोर्ड एंडेव्हर (फोर्ड भारताच्या बाहेर पडल्यानंतर, मागणी वाढली आहे) सोबतच लोकप्रिय पर्याय आहे. तर लक्झरी स्पेसमध्ये मर्सिडीज, ऑडी, लँड रोव्हर यांनाही मागणी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
-
फक्त 5 मिनिटात इलेक्ट्रिक स्कूटर होणार चार्ज, Ola ने या कंपनीशी केली हातमिळवणी
-
Electric Car: देशात सर्वाधिक विक्री होणारी 'ही' इलेक्ट्रिक कार महागली, जाणून घ्या नवीन किंमत
- Electric Scooter: 190km ची रेंज देते 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत फक्त...
- Maruti Gift : मारूती कारकडून ग्राहकांसाठी खुशखबर! केवळ 500 रूपयांत दिली 'ही' खास भेट
- RE Scram 411 vs Himalayan: रॉयल एनफिल्डची Scram 411 की हिमालयन? कोणती बाईक तुमच्यासाठी योग्य?