Royal Enfield Himalayan 450 लवकरच लॉंच होणार, सध्याच्या मॉडेलपेक्षा असेल वेगळे, जाणून घ्या
Royal Enfield Himalayan 450 : रॉयल एनफिल्डची ही बाईक त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षाही अधिक उत्कृष्ट असणार आहे. ही बाईक पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात लॉन्च करू शकते.
Royal Enfield Himalayan 450 : आपल्या दमदार बाइक्ससाठी प्रसिद्ध असलेल्या रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) कंपनीने नवीन बाइक हिमालयन 450 लवकरच भारतात सादर करण्याचे संकेत दिले आहेत. या संदर्भात कंपनीने एक टीझर व्हिडिओ जारी केला आहे. जे पाहून अंदाज बांधला जात आहे की, ही बाईक त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षाही अधिक उत्कृष्ट असणार आहे. रॉयल एनफिल्ड ही बाईक पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात लॉन्च करू शकते.
टीझरमध्ये काय दाखवले होते?
रॉयल एनफिल्ड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, टेस्टिंग 1, 2, 3…. या व्हिडिओमध्ये हिमालयन 450 हे डोंगराळ भागात नदीवर चालवताना दाखवली आहे. या बाईकच्या सध्याच्या व्हर्जनला भरपूर प्रतिसाद मिळणार असं सांगण्यात येत आहे.
इंजिन
रॉयल एनफिल्डची ही नवीन मोटरसायकलला 450cc इंजिन असेल, जी 40 bhp जास्तीत जास्त पॉवर आणि 45 Nm जास्तीत जास्त टॉर्क निर्माण करू शकते. जी 6-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडली जाईल. या बाईकची शक्ती KTM 390 Adventure आणि BMW G310 GS पेक्षा खूप जास्त असेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेले मॉडेल 24.3 bhp पॉवर आणि 5-स्पीड गिअरबॉक्समध्ये 32 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते.
कसे असेल लूक?
कंपनीने या नवीन मोटरसायकलचा पहिला अधिकृत टीझर रिलीज केला आहे. मात्र यामध्ये बाईकची केवळ झलकच पाहायला मिळाली आहे. जे पाहून असं समजतंय की, सध्याच्या बाईकच्या तुलनेत यात बरेच बदल होतील, ज्यात समोरचा भाग, हेडलॅम्प काउल, नवीन साइड पॅनल्स, इंधन टाकी आणि विंडशील्डमध्ये बदल समाविष्ट आहेत. टीझरमध्ये ही नवीन बाईक खूपच बोल्ड आणि आकर्षक दिसत आहे.
रॉयल एनफिल्डची ही आजपर्यंतची दुसरी स्वस्त बाईक
कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपली नवीन बाईक Royal Enfield Hunter 350 देखील लॉन्च केली आहे. रॉयल एनफिल्डची ही आजपर्यंतची दुसरी सर्वात स्वस्त बाईक आहे. ही बाईक दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये कंपनीच्या Meteor 350 आणि Classic 350 मध्ये सापडलेल्या इंजिनांचाच वापर करण्यात आला आहे.रॉयल एनफील्ड
आता इलेक्ट्रिक बाइक सेगमेंटमध्ये देखील प्रवेश करणार
रॉयल एनफिल्ड बाईकची मागणी भारतीय बाजारपेठेत कायम आहे, तसेच कंपनी देखील वेगाने आपली श्रेणी वाढवत आहे. हे पाहता हंटर 350 नंतर आता नवीन जनरेशन बुलेट 350 देखील बाजारात आणणार असल्याची बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉयल एनफील्ड आता इलेक्ट्रिक बाइक सेगमेंटमध्ये देखील प्रवेश करणार आहे. सध्या, 2025 पर्यंत सादर केले जाण्याची अपेक्षा आहे. रॉयल एनफिल्ड सध्या आपली श्रेणी वेगाने वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या विभागांसाठी, कंपनी 350 cc ते 650 cc मधील अनेक मॉडेल्स तयार करत आहे. 2026 सालापर्यंत, रॉयल एनफिल्ड त्याच्या दुसऱ्या पिढीच्या J प्लॅटफॉर्मवर 450 सीसी बाईक तयार करू शकते.
महत्वाच्या बातम्या :
- Ford Cuts Jobs : ईव्ही पुर्नरचनेसाठी फोर्डने भारत आणि अमेरिकेतील 3,000 नोकर्या केल्या कमी
- McLaren Automotive: मॅक्लारेन ऑटोमोटिव्ह भारतात घेणार एंट्री, मुंबईत उघडणार आपलं पाहिलं शोरूम