Royal Enfield च्या विक्रीत 133 टक्क्यांनी वाढ, Classic 350 आणि Meteor 350 ची वाढली मागणी
Royal Enfield May Sales Report : प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी Royal Enfield च्या मे 2022 च्या अहवालात कंपनीच्या विक्रीत 133 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.
Royal Enfield May Sales Report : प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी Royal Enfield च्या विक्रीत 133 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ही माहिती दिली आहे. Royal Enfield ने अलीकडेच मे महिन्यात एकूण 63,643 बाईक विकल्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 27,294 बाईक विकल्या होत्या, जे आताच्या तुलनेत 2 पट जास्त आहे.
रॉयल एनफिल्डच्या Classic 350 आणि Meteor 350 या दोन मॉडेलला भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे. याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले की, विदेशी बाजारपेठेत आतापर्यंतच्या सर्वाधिक विक्रमी 10,118 बाईक्सची विक्री करण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे. यासह आंतरराष्ट्रीय विक्रीचा आकडा 40 टक्क्यांहून अधिक झाला आहे. Royal Enfield चे Classic 350 हे भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय मॉडेल आहे. क्लासिक 350 ला देखील 2021 मध्ये अपडेट करून लॉन्च करण्यात आले होते. लोकप्रियतेच्या यादीत दुसरे स्थान रॉयल एनफिल्ड Meteor 350 आहे. कंपनीने अलीकडेच मलेशियन मार्केटमध्ये Classic 350 आणि Meteor 350 लाँच केले आहेत.
नवीन Classic 350 मध्ये मिळणार हे फीचर्स
कंपनीने नवीन जनरेशन क्लासिक 350 अधिक 11 रंग पर्यायांमध्ये लॉन्च केली आहे. रॉयल एनफिल्डने इंधन पातळी, ओडोमीटर आणि ट्रिप मीटर यासारखी महत्त्वाची माहिती प्रदर्शित करण्यासाठी एक छोटा डिजिटल क्लस्टर दिला केला आहे. Classic 350 ला टर्न-बाय-टर्न ट्रिपर नेव्हिगेशन मिळेल, जे आधी Meteor 350 मध्ये सादर करण्यात आले होते. क्लासिक 350 च्या किंमतीबद्दल बोललो, तर याची प्रारंभिक किंमत 1.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.
दरम्यान, कंपनी लवकरच देशात Meteor 350 मॉडेल लाइनअपचा विस्तार करणार आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, Royal Enfield 18-इंच फ्रंट आणि 17-इंचाच्या मागील अलॉय व्हीलसह नवीन प्रकार लॉन्च करण्यावर काम करत आहे. जूनच्या अखेरीस किंवा जुलै 2022 च्या सुरुवातीला ही बाईक लाँच होऊ शकते, असे बोलले जात आहे.
संबंधित बातम्या:
येत आहे Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक, जूनमध्ये लोणार लॉन्च
Royal Enfield ची 'ही' जबरदस्त बाईक या दिवशी होणार लॉन्च; जाणून कोणते मिळणार फीचर्स
Royal Enfield नाही, तर 'ही' आहे भारतातील 1000cc ची बेस्ट सेलिंग बाईक