(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Royal Enfield Classic 500 चे लिमिटेड एडिशन सोल्ड आऊट, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Royal Enfield Classic 500 Limited Edition: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Royal Enfield च्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. कंपनीच्या बाईकला देशात खूप मागणी देखील आहे.
Royal Enfield Classic 500 Limited Edition: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Royal Enfield च्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. कंपनीच्या बाईकला देशात खूप मागणी देखील आहे. अलीकडेच कंपनीने Classic Collectible लॉन्च केली आहे. जी Royal Enfield Classic 500 चा लहान मॉडेल आहे. कंपनीच्या वतीने पहिल्यांदा ही बाईक Rider Mania 2022 मध्ये आठ वेगवेगळ्या रंगात सादर करण्यात आली होती. Collectible ला बाजारात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Royal Enfield Classic 500 Collectible सोल्ड आऊट झाली आहे.
Royal Enfield Classic 500 Collectible True-Blue खास रॉयल एनफिल्ड रायडरसाठी तयार करण्यात अली आहे. मिनिएचरमध्ये मूव्हिंग थ्रॉटल, मूव्हिंग क्लच युनिट, अॅडजस्टेबल सस्पेंशन, अॅडजस्टेबल चेन ठेवण्यासाठी मायक्रो की असे मूव्हिंग पार्टस देण्यात आले आहेत. या बाईकचे वजन सुमारे 8.5 किलो आहे. याची लांबी 2.5 फूट, रुंदी 1.25 फूट आणि उंची 0.85 फूट आहे. याची किंमत अंदाजित 67,990 रुपये आहे. कंपनीने आपल्या या नवीन बाईकमध्ये UCE 500cc BS IV इंजिन दिले आहे. क्लासिक 500 ट्रिब्युट ब्लॅक बीएस IV ही फॅक्टरीमध्ये प्रीमियम लेदर टूरिंग सीट्सच्या जोडीने सुसज्ज असेल.
Royal Enfield Super Meteor 650
कंपनीने आपल्या आणखी एका बाईकचा टीझर नुकताच रिलीझ केला आहे. या बाईकचे नाव आहे Royal Enfield Super Meteor 650. ही बाईक भारतीय बाजारपेठेत 2023 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. कंपनीने 8 नोव्हेंबर रोजी मिलान (इटली) येथे झालेल्या EICMA 2022 मोटर शोमध्ये ही बाईक सादर केली होती. या बाईकमध्ये कंपनी 648 cc, इन-लाइन ट्विन-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देऊ शकते. जे 47 Bhp पॉवर आणि 52 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही बाईक आधी जागतिक बाजारात यानंतर भारतात लॉन्च केली जाऊ शकते.
दरम्यान, Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी लवकरच भारतात क्लासिक बाईक निर्माता BSA कंपनीची BSA Scrambler 650 बाईक लॉन्च होणार आहे. ही एक दमदार बाईक आहे. ज्याचे इंजिन पॉवरफुल आहे. कंपनी यात चार-व्हॉल्व्ह DOHC, 652cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देऊ शकते. जे 6,000 rpm वर 45 bhp पॉवर आणि 4,000 rpm वर 55 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करते. ही बाईक 2023 मध्ये लॉन्च होऊ शकते.